विधवांचा सन्मान महिलांसाठी ऊर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवांचा सन्मान महिलांसाठी ऊर्जा
विधवांचा सन्मान महिलांसाठी ऊर्जा

विधवांचा सन्मान महिलांसाठी ऊर्जा

sakal_logo
By

44156
------------
विधवांचा सन्मान महिलांसाठी ऊर्जा
डॉ. भारती पाटील; घाळी महाविद्यालयात विधवांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : परिवर्तनवादी विचारवंतांनी महिलांना सन्मान मिळावा यासाठी अनेक आंदोलने केली. आज विविध ग्रामपंचायतींनी विधवांना सन्मान दिलेला आहे. हा उपक्रम एकूणच स्त्रीसाठी ऊर्जा देणारा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. भारती पाटील यांनी केले.
येथील डॉ. घाळी महाविद्यालय व समाजवादी प्रबोधिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उपप्राचार्य अनिल उंदरे अध्यक्षस्थानी होते. डॉ. पाटील म्हणाल्या, ‘‘आजच्या तरुणाईने विधवा सन्मानासाठी पुढे आले पाहजे. महात्मा फुले यांनी कृतिशील विचारातून जो एक आदर्श घालून दिला आहे, तो अधिक पुढे नेण्याची आज गरज आहे.’’
स्वराज्य महोत्सवातंर्गत हा कार्यक्रम झाला. २० विधवांची ओटी भरून सन्मान केला. तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला. प्रियांका यादव (नूल), अनिल पाटील (शिप्पूर), प्रभावती बागी (हसूरचंपू), वीणा पाटील (हनिमनाळ), शारदा आजरी (गडहिंग्लज) यांची भाषणे झाली. प्रामुख्याने अत्याळ, शेंद्री, नेसरी, ऐनापूर, जरळी, हेब्बाळ जलद्याळ, हलकर्णीचे सदस्य उपस्थित होते. डॉ. सरोज बिडकर यांना युथ पार्लमेंट एक्सलन्स अवार्ड मिळाल्याबद्दल सत्कार झाला. वीरपत्नी गीता घुगरे (जरळी), सविता बिरंजे (वैरागवाडी), राजलक्ष्मी कागिलकर (नंदनवाड), पद्मा जाधव (बसर्गे) यांचा सन्मान झाला. समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. पुंडलिक रक्ताडे यांनी स्वागत केले. डॉ. शशिकांत संघराज यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. अश्‍विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सरोज बिडकर यांनी आभार मानले. उज्ज्वला दळवी, शिवाजी होडगे, आप्पासाहेब कमलाकर, अशोक पट्टणशेट्टी, डॉ. काशिनाथ तनंगे, डॉ. अनिल पाटील, सुनील देसाई, सुभाष कोरे, योगेश पाटील, आशपाक मकानदार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88380 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..