ऑनलाईन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन फसवणूक
ऑनलाईन फसवणूक

ऑनलाईन फसवणूक

sakal_logo
By

अनोळख्या ‘व्हिडीओ कॉल’चा बसेल फटका
ब्लॅकमेल करून आर्थिक लुट; सोशल मिडीया हातळताना रहा सावध

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः एका चांगल्या हुद्दयावर काम करणाऱ्या व्यक्ततीच्या मोबाईलवर एका अनोळखी महिलेचा व्हिडीओ कॉल आला. तिने हायऽऽ म्हणत मधूर भाषेत संवाद साधण्यास सुरवात केली. संबधित व्यक्तीने आपण कोण? मी ओळखलं नाही? अशी विचारणा केली. ‘अरे सामने कॅमेरा रख कर बात कर, पहचान जागेया!’ असे तिने उत्तर दिले. काही समजण्या आगोदर हा कॉल बंद झाला. पुढे काही मिनीटात त्यांना त्यांचाच अश्लिल व्हिडीओ दाखवून तो व्हायरल करण्याची भीती दाखवत पैशाची मागणी करण्यात आली. घाबरलेल्या व्यक्तीने प्रतिष्ठेपोटी त्यांची मागणी पूर्ण केली. पण, ही मागणी दररोज हळूहळू वाढू लागली. अखेर त्यांनी धाडस करून पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्याचा बंदोबस्त केला.
हे झालं एक प्रातिधिक उदाहरण. पण प्रत्येकवेळी ब्लॅकमेल केली जाणारी व्यक्ती असे धाडस करेल याची खात्री देता येत नाही. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून गंडा घालणारी यंत्रणा तीन चार वर्षापूर्वी सक्रिय होती. तसेच हनी ट्रॅपच्या माध्यमातून अनेक तरुणांना जाळ्यात ओढून त्यांना लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार पुढे आले होते. यासंबधी पोलिसांनी नागरिकांचे प्रबोधन केले. त्यानंतर हे प्रकार कमी झाले होते.
दरम्यान, सायबर पोलिसांकडून बक्षीस, लॉटरी, जुने वाहन स्वतात विक्री अशा अमिषांसह अनोळखीने पाठविलेल्या लिंक, क्यूआरकोडपासून सावध रहाण्याबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. भामट्यांनी आता पुन्हा मोबाईलवर व्हिडीओ कॉलच्या आधारे अश्लिल व्हिडीओ तयार करून गंडा घालण्याचा फंडा वापरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अनोळख्या व्हिडीओ कॉलपासून सावध राहण्याची गरज आहे.
-------
चौकट
ब्लॅकमेलसाठी आधार
-व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क
-अश्लील व्हिडीओ तयार करून
व्हायरल करण्याची भीती
-पोलिसात तक्रार देण्याची धमकी
-----------
चौकट
येथे करा तक्रार...
-http://cybercrime.gov.in/
-कोल्हापूर सायबर पोलिस हेल्पलाईन नंबर - ८४१२८४११००

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88382 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..