राधाकृष्णन पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधाकृष्णन पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात
राधाकृष्णन पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

राधाकृष्णन पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

sakal_logo
By

44217

राधाकृष्णन पतसंस्थेची
वार्षिक सभा उत्साहात
गडहिंग्लज, ता. २१ : येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. संस्थाध्यक्ष प्रकाश कुंभार अध्यक्षस्थानी होते. शिवप्रसाद तेली, बाळेश नाईक, संजय चाळक, सतीश तेली, अध्यक्ष कुंभार व संचालकांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
नवीन कोनशिलेचे अनावरण मान्यवरांनी केले. सभेत निवृत्त सभासद संजय चाळक, राजाराम नाईक, मलाप्पा इंगवले, बचाराम चौगुले, प्रकाश पाटील, शोभा रावण यांचा सत्कार झाला. सचिव अजित पाटील यांनी अहवालवाचन केले. उपाध्यक्ष जे. टी. पाटील यांनी संस्थेचा ताळेबंद सादर केला. संस्थेला ३३ लाख ९४ हजाराचा नफा झाला असून १५ टक्के लाभांश व दिवाळी भेट ५ टक्के देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दिनकर खवरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक मारुती घोलराखे यांनी आभार मानले. अध्यक्ष कुंभार यांनी नऊ टक्केने कर्ज वितरण, मृत सभासदांना एक लाखाचे आर्थिक सहाय करीत असल्याचे सांगितले. चालू वर्षापासून मृत कल्याण निधी १५ हजार रुपये केल्याची घोषणाही त्यांनी केली. शिक्षक समितीचे सरचिटणीस नामदेव पाटील, डॉ. जे. पी. नाईक व्यासपीठाचे अध्यक्ष टी. एम. जाधव, संचालक सतीश तेली, संजय चाळक, सिकंदर कांबळे, रुपाली गुरव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88442 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..