वसतीगृहात मुक्काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसतीगृहात मुक्काम
वसतीगृहात मुक्काम

वसतीगृहात मुक्काम

sakal_logo
By

44246

समाज कल्याण अधिकाऱ्यांनी
वसतीगृहात केला मुक्काम

कोल्हापूर, ता. १९ : सामाजिक न्याय विभागा मार्फत अनुदानित व स्वयंसेवी संस्था मार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा , आरोग्य सेवा मिळतात का? याची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी हेरे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले शासकीय वसतिगृहात अचानक भेट दिली. एक दिवस याच वसतीगृहात मुक्कामही केला आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
घाटे म्हणाले, वसतीगृहातील सोयी सुविधांमध्ये वाढ करणे तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणीच्या मागवा घेण्यासाठी मुक्काम केला. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद उपक्रम नावाचा अभिनव उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 46 अनुदानित वसतीगृहात समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी 18 ऑगस्टला सायंकाळी अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्व तपासणी अधिकारी यांनी वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यासोबत सायंकाळी रात्रीचे जेवण करून मुक्काम केला व विद्यार्थ्यांची दिनचर्या समजून घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्याबाबत विद्यार्थ्याबरोबर हितगुज केले.
तपासणीमध्ये आढळलेल्या उणीवा किंवा चांगल्या बाबीबाबत एकत्रित तपासणी अधिकारी व अधीक्षक यांची मंगळवारी (ता. 23) चर्चासत्र घेतले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88485 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..