गोकुळ प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ प्रत्युत्तर
गोकुळ प्रत्युत्तर

गोकुळ प्रत्युत्तर

sakal_logo
By

आम्ही दबाव टाकणारे नाही
दूध उत्पादकांचे हित साधणारे
संचालिका रेडेकर; ‘राजाराम’ची सभा शिरोलीत का घेतली
कोल्हापूर, ता. १९ ः दूध उत्पादकांनी मोठ्या विश्वासाने ‘गोकुळ’ची सूत्रे सत्ताधारी आघाडीकडे सोपविली आहेत. सत्ताधारी आघाडीने दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला. आम्ही दबाव टाकणारे नाही तर दूध उत्पादकांचे हित साधणारे आहोत, असा प्रतिटोला ‘गोकुळ’च्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी लगावला.
पत्रकात म्हटले आहे, संचालिका शौमिका महाडिक यांनी केलेली टीका निरर्थक आहे. महासैनिक दरबार हॉल येथे पहिल्यांदा गोकुळची सर्वसाधारण सभा होत नाही. यापूर्वीही २६ सप्टेंबर २०१४ ला संघाची ५२ वी सभा याच हॉलमध्ये झाली होती. तत्पूर्वीची सभा मार्केट यार्डमध्ये झाली होती. सध्या पावसाचे दिवस असून खुल्या जागेत सभा घेतली असता सभासदांची गैरसोय होऊ शकते या कारणास्तव ताराबाई पार्कजवळच बंदिस्त व पुरेशी बैठक व्यवस्था असलेली जागा सभेसाठी निवडल्याचे श्रीमती रेडेकर यांनी म्हटले आहे.
‘गोकुळ’चे कार्यक्षेत्र जिल्हा आहे, कसबा बावडा जिल्ह्यातीलच ठिकाण आहे. दूध उत्पादक आणि दूध संघ यांचे नाते घट्ट आहे. संचालक, अधिकारी, कर्मचारी व इतर माध्यमातून दूध उत्पादक संघाच्या कायम संपर्कात असतात. संघाच्या विविध विभागात दूध उत्पादक हे वेळोवेळी सूचना करत असतात व सूचनाचे निरसन करून घेत असतात. संघाची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शांतपणे व खेळीमेळीत सभासदच पार पडतील यात शंका नाही. मुळात ‘गोकुळ’चा सभासद चाणाक्ष आहे. तो कोणत्याही दबावाला बळी पडत नाही, असेही श्रीमती रेडेकर यांनी म्हटले आहे.

खबरदारी घ्या
सौ. महाडिक संघाच्या संचालिका आहेत, त्यांनी टीका करण्यापेक्षा संघाने घेतलेले सभासदाभिमुख निर्णय माहीत करून घ्यावेत. दूध उत्पादक शेतकरी ‘गोकुळ’चे मालक आहेत. आम्ही सर्व संचालक विश्वस्त आहोत. सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अध्यक्ष व संचालक सक्षम आहेत. राजकारण करत असताना संस्थेचे नाव खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असा टोलाही या पत्रकात लगावला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88533 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..