स्वातंत्र्यदिनानिमित्त चाटे शिक्षण समूहातर्फे सैनिकांचे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यदिनानिमित्त चाटे शिक्षण समूहातर्फे सैनिकांचे सत्कार
स्वातंत्र्यदिनानिमित्त चाटे शिक्षण समूहातर्फे सैनिकांचे सत्कार

स्वातंत्र्यदिनानिमित्त चाटे शिक्षण समूहातर्फे सैनिकांचे सत्कार

sakal_logo
By

चाटे शिक्षण समूहातर्फे 
सैनिकांचे सत्कार 

कोल्हापूर, ता. १९ : चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागातर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिकांचा सत्कार व देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवणे, स्वातंत्र्याबद्दलची माहिती देणे आणि देशाने आपल्यासाठी काय केले याऐवजी देशासाठी आपण काय केले पाहिजे हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आम्हास अत्यंत महत्त्‍वाचे वाटते, असे चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
सैनिकांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने नायब सुभेदार राघोबा सावंत, हवालदार पांडुरंग आगळे, मारुती पाटील, नायक सुभेदार सागर जाधव, नाईक महादेव पाटील, हवालदार अमोल शिंदे, हवालदार संदीप पाटील या सैनिकांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य नारायणन यांनी चाटे समूहाच्या उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांमध्ये सहकार्याचे आश्वासन दिले. प्रा. मधुकर पाटील, मोहन पटेल, संभाजी पाटील, यल्लाप्पा गाडीवडर, महेंद्र परमार, प्रा. सर्जेराव राऊत, प्राचार्य बी. एस. वडगावे, प्रा. एल. डी. थोरात, प्रा. मदन नागोसे, प्रा. भारत भोसले, प्रा. अमर शितोळे, प्रा. वसंत जाधवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88569 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..