इन्फ्लुयन्‍झा लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्फ्लुयन्‍झा लसीकरण
इन्फ्लुयन्‍झा लसीकरण

इन्फ्लुयन्‍झा लसीकरण

sakal_logo
By

जिल्ह्यात इन्फ्लुएन्झाचे लसीकरण
स्वाईन फ्लूची लक्षणे; व्याधीग्रस्त, गर्भवतींना प्राधान्य; आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः स्वाईन फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात व्याधीग्रस्तांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यास जीवावर बेतू शकेल अशा स्थितीत इन्फ्लुएन्झाचे लसीकरण सुरू आहे. सीपीआरसह शासकीय ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातही लस उपलब्ध असल्याने व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय यंत्रणेने केले आहे.
इन्फल्यूएन्झाच्या चार उपजाती विरुद्ध (एच वन, एन वन, इन्फल्यूएन्झा एच ३, एन २) या लक्षणाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरणारी लस आहे. लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात इन्फल्युएन्झाविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवडे लागतात. या प्रकारे मिळालेली प्रतिकारशक्ती वर्षापर्यंत टिकू शकते. त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यातील आजारी रुग्णांची संख्या वाढती आहे. याच स्वाईन फ्लू तसेच स्वाईन सदृश लक्षणांची संख्या जास्त होत आहेत. यातही ज्या व्यक्तींना मधुमेही व उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरात एक लाख लस आल्या असून लसीकरण सुरू झाले आहे.
ज्यांना ॲलर्जी आहे किंवा अन्य काही औषधे सुरू आहेत त्याची माहिती देऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घ्यावी लागते. लस घेतल्यानंतर वेदणा होणे, लालसरपणा, सूज येणे व असे सर्वसाधारण परिणाम दिसू शकतात. मात्र अपवादात्मक स्थितीतही लक्षणे गंभीर झाली तर डॉक्टरांकडून उपचार करण्याची सुविधा आहे.

कोट
स्वाईन फ्लू, इन्फल्युएन्झा सारख्या आजाराची लक्षणे गंभीर होऊ नयेत, प्रकृती बिघडू नये यासाठी खबरदारी म्हणून इन्फल्युएन्झा लसीकरण सुरू झाले. लसीकरण मोफत आहे. व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. हर्षला वेदक, निवासी वैद्यकीय अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88582 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..