निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

४४३४९
सखाराम पाटील
कोल्हापूर : स्वातंत्र्यसैनिक, फाय फाउंडेशन पुरस्कार प्राप्त सखाराम दादा पाटील (वय ९६) यांचे निधन झाले. शासनाच्या वतीने अंत्यसंस्कारासाठी ‘करवीर’चे तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार उपस्थित होते. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. फायर कॉलेजचे प्राचार्य किरण पाटील यांचे ते चुलते होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २१) शिरोली दुमाला येथे आहे.

४४३५३
लक्ष्मण मिराशी
कोल्हापूर : नूतन मराठी विद्यालय बँच नंबर एक प्राथमिक शाळेतील माजी मुख्याध्यापक लक्ष्मण गंगाधर मिराशी (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अभय पब्लिसिटीचे संस्थापक, ‘आसमा’चे संचालक अभय मिराशी, अजित मिराशी यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २१) आहे.

४४३६०
पांडुरंग पाटील
कोल्हापूर : प्रतिभानगर, जगदाळे कॉलनी येथील पांडुरंग शंकर पाटील (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, मुलगी, जावई, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. श्री शाहू छत्रपती मिल्स कामगार संघाचे माजी जनरल सचिव काकासाहेब पाटील यांचे ते बंधू होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २१) आहे.

४४३९८

अस्लम मोमीन
कोल्हापूर ः रुक्मिणीनगर येथील अस्लम शमशुद्दीन मोमीन (वय ६६) यांचे निधन झाले. पोलिस उपअधीक्षकपदावरून ते निवृत्त झाले होते. त्यांनी कागल, जिल्हा विशेष शाखा आणि शहर वाहतूक शाखेत पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले होते. वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबर मुख्यालयातील गार्डन विकसित करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

४४३६३
नरेंद्र सावंत
कोल्हापूर : शाहूनगर येथील नरेंद्र कृष्णराव सावंत (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, आई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २१) आहे.

४४३६४
रणजित विरभद्रे
कोल्हापूर : वर्षानगर येथील रणजित नंदकुमार विरभद्रे (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

०१७८४
दीपक भोसले
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील दीपक पांडुरंग भोसले (वय २५) याचे निधन झाले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

२६४८
संजय पोतदार
कळे : आसगाव (ता. पन्हाळा) येथील संजय गणपती पोतदार (वय ५४) यांचे निधन झाले. मरळी प्राथमिक शाळेत ते अध्यापक होते. श्री. विश्वकर्मा सुवर्णकार समाज संस्थेचे ते विद्यमान संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुले, सून, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २१) आहे.

४४२५५
सूरज पोवार
कसबा बावडा ः पोवार मळा (रमण मळा) येथील सूरज मधुकर पोवार (वय ३४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २१) आहे.

44289
गणपतराव मोरबाळे
इचलकरंजी ः येथील व्यंकटेश कॉलनीतील प्रतिष्ठित नागरिक व जुन्या काळातील नामवंत टेनिस खेळाडू गणपतराव बहिर्जी मोरबाळे (वय ७७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे व जावई असा परिवार आहे.

44372
तुळसाबाई कळांद्रे
गडहिंग्लज : कोळिंद्रे (ता. आजरा) येथील तुळसाबाई गोविंद कळांद्रे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता. २०) रक्षाविसर्जन आहे. नेसरीतील प्रशांत ट्रेडिंग कंपनीचे मालक प्रशांत कळांद्रे यांच्या त्या आई होत.

44396
हौसाबाई कलागते
इचलकरंजी ः येथील श्रीमती हौसाबाई गणपती कलागते (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २०) आहे. माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्या त्या आई होत.

07133
राजमती पाटील
घुणकी ः वाठार (ता. हातकणंगले) येथील श्रीमती राजमती दिनकर पाटील (वय ७६) यांचे निधन झाले.त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २०) आहे.

------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88594 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..