समाजकल्याण मंगळवारी चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजकल्याण मंगळवारी चर्चासत्र
समाजकल्याण मंगळवारी चर्चासत्र

समाजकल्याण मंगळवारी चर्चासत्र

sakal_logo
By

समाजकल्याण संवाद
उपक्रमांतर्गत मंगळवारी चर्चासत्र
कोल्हापूर ः सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदानित व स्वयंसेवी संस्था मार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित वसतिगृहातील सोयी सुविधांमध्ये वाढ करणे, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणीच्या मागोवा घेण्यासाठी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४६ अनुदानित वसतिगृहांना समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. सर्व तपासणी अधिकाऱ्यांनी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यासोबत रात्रीचे जेवण करून मुक्काम केला व विद्यार्थ्यांची दिनचर्या समजून घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी संवादही साधला. तपासणीमध्ये आढळलेल्या उणिवा किंवा चांगल्या बाबीबाबत तपासणी अधिकारी व अधीक्षकांसाठी २३ ऑगस्टला चर्चासत्राचे आयोजन केले असून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

४४३६१
महापालिका क्रीडा अधिकारीपदी पोवार
इचलकरंजी ः येथील राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांची महापालिकेच्या क्रीडा अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नगरसचिव विजय राजापूरे व नगररचनाकर रणजीत कोरे यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी नगरसेवक दिलीप मुथा उपस्थित होते. महापालिका झाल्यानंतर क्रीडा स्पर्धांसाठी महापालिका क्षेत्र जिल्हास्तर मानले जाते. त्यामुळे विविध शाळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजीत करणे व विद्यार्थ्यांना करीडा क्षेत्रात संधी देणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी महापालिकेने क्रीडा अधिकारी पदाची निर्मिती केली आहे. आकृतिबंधामध्ये हे पद मंजूर नाही. तथापि, शासनाकडून हे पद मंजूर होईपर्यंत श्री. पोवार यांची नियुक्ती केली. मुख्याध्यापकासह या पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविल्याचे महापालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख यांनी नियुक्तीपत्रात नमूद केले आहे.

किसान सभेचे जिल्हा अधिवेशन सोमवारी
कोल्हापूर ः अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी (ता. २२) जिल्हा अधिवेशन होणार आहे. सभेच राज्याध्यक्ष डॉ. अजित नवले मार्गदर्शन करणार आहेत. येथील शाहू स्मारक भवनात सकाळी ११ वाजता अधिवेशन सुरू होईल. शेतकऱ्यांची आव्हाने ऊस व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, देवस्थान जमीनधारकांचे प्रश्न आदी मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. उदय नारकर, डॉ. सुभाष जाधव, प्राचार्य ए. बी. पाटील, नारायण गायकवाड आदीनी केले आहे.


ईपीएस ९५ पेन्शनधारकांची सभा
कोल्हापूर ः ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी २३ ऑॅगस्टला जाहीर सभा होणार आहे. मंगळवार पेठेतील बजापराव माने हॉल महाराणी ताराराणी हायस्कूल शेजारी येथे सायंकाळी ५ वाजताही सभा होईल. जिल्ह्यातील ईपीएस पेन्शनधारकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व श्रमिक संघाचे अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88636 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..