धनंजय महाडीक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय महाडीक
धनंजय महाडीक

धनंजय महाडीक

sakal_logo
By

44404

आता महाभारत सुरू झालंय
खासदार धनंजय महाडिक; सर्वांना सोबत घेऊन जिल्हा भाजपमय करणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मी आघाडीचा उमेदवार असूनही ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनी माझा घात केला. त्यानंतरच्या सलगच्या निवडणुकीत आमचा पराभव झाल्यानंतर महाडिक संपले, असे अनेकांना वाटू लागले. कार्यकर्त्यांतही नैराश्‍य आले होते. सत्ता बदलानंतर मला व माझ्या संस्थांना त्रास देण्यास सुरुवात झाली; पण हे चक्र उलटे फिरते. आज सूर्य मावळला की तो उद्या उगवतोच. आमची सत्ता आली तर आमचा त्रास तुम्हाला झेपणार नाही, असा इशारा मी दिला होता. आता मी खासदार झालो आहे. राज्यातही सत्तांतर झाले आहे. त्यामुळे येथून पुढे महाभारतच सुरू होईल, असा खणखणीत इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी माजी राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांना त्यांचे नाव न घेता दिला.
दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांसह महापालिकांत सर्वांना सोबत घेऊन भाजपची सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही, असेही श्री. महाडिक म्हणाले. श्री. महाडिक यांच्या नेतृत्वाखालील धनंजय महाडिक युवाशक्ती व भाजपच्या वतीने दसरा चौकात आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार अमल महाडिक, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’ संचालिका शौमिका महाडिक, अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, विश्‍वजित महाडिक आदी उपस्थित होते.
श्री. महाडिक म्हणाले, ‘‘राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो असे म्हटले जाते; पण लोकसभेला कूटनीतीने, कपटनीतीने ज्याप्रमाणे अभिमन्यूला घेरले त्याप्रमाणे मला घेरण्यात आले. गेल्‍या अडीच वर्षांत मला आणि माझ्या कार्यकर्त्यांसह संस्थांना त्रास दिला. माझ्यावर १४ गुन्हे दाखल केले. माझ्या कारखान्याचे गेली २५ वर्षे सभासद असलेले सभासद रद्द केले, तीच पद्धत राजाराम कारखान्यात अवलंबली. आमची शिक्षण संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न केला. राजकारणात असे होऊ नये; पण तुमच्यासारखी कूटनीती आम्ही करणार नाही कारण आम्ही महादेवराव महाडिक यांच्या तालमीत तयार झालो आहे. त्यामुळे येथून पुढे महाभारत होणार आहे आणि वाईटाचा नाश होणार आहे.’’

थेट पाईपलाईन सोडून...
कोल्हापूर शहराला थेट पाईप लाईनने पाणी देण्याव्यतिरिक्त विमान सेवा, बास्केट ब्रीज, पन्हाळा तटबंदी, तसेच कोल्हापूर खंडपीठाचे कामही पूर्ण करणार आहे. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे. त्यामुळे खंडपीठाचा प्रश्न नक्कीच निकालात निघेल, यात शंका नाही. थेट पाईपलाईन पूर्ण करण्याचा प्रश्न त्यांनी घेतला आहे. ५२ कोटी विमानतळास मिळाले आहेत. त्यामुळे यामध्ये मी लक्ष घालणार नाही, असेही श्री. महाडिक यांनी सांगितले. प्रश्न नक्कीच निकालात निघेल, यात शंका नाही. थेट पाईपलाईन पूर्ण करण्याचा प्रश्न त्यांनी घेतला आहे. त्यामुळे यामध्ये मी लक्ष घालणार नाही, असेही महाडिक यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88668 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..