रंग-शिल्पसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंग-शिल्पसौंदर्य
रंग-शिल्पसौंदर्य

रंग-शिल्पसौंदर्य

sakal_logo
By

शिल्पसौंदर्य - लोगो

44268

वि. स. खांडेकर यांचा अर्धपुतळा

‘ययाति’ या कादंबरीसाठी देशाच्या पातळीवरील सर्वोच्च आणि मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोल्हापुरातील थोर लेखक वि. स. खांडेकर यांचा गौरव कोल्हापूरकरांनी अभिमानाने करणे स्वाभाविकच आहे. त्यांच्या एकूणच साहित्यिक कार्याचा गौरव करताना कोल्हापूर महापालिकेच्या वतीने टाकाळा येथील चौकात त्यांचा कास्य धातूमधील अर्धपुतळा स्थापित केला आहे. वृद्धत्वाकडे झुकलेल्या शिडशिडीत असे व्यक्तिमत्त्व आणि तरीही विद्वत्तेचे तेज झळाळणाऱ्या या सरस्वतीपुत्राचे शिल्प घडवताना शिल्पकाराने नेमकेपणाने त्यांचे स्वभाववैशिष्ट्य साधले आहे. उभ्या कॉलरच्या जॅकेटमध्ये उभ्या कॉलरचा सदरा, त्यावर अंगाबरोबर बसलेले उभ्या कॉलरचा खादीसारखा पोत असलेले जॅकेट आहे. लेखकाची ओळख जपणारी बाब म्हणजे त्यांच्या खिशामध्ये आवर्जून लेखणी दर्शवली आहे. ते नेहमी वापरत त्या पद्धतीची टोपी डोक्यावर आहे. चष्मा असणाऱ्या कृष चेहऱ्यावर शांत संयमी भाव त्यांच्या सृजनाचा साक्षात्कार दर्शवतात. सामान्य माणसासारखा माणूस पण त्याच्या करारी नजरेत कर्तृत्वाचा उत्तुंगपणा शिल्पित करण्यात शिल्पकार (कै.) श्रीकांत डोंगरसाने यशस्वी झाले आहेत.