गंगावेश येथील चहा व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गंगावेश येथील चहा व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा
गंगावेश येथील चहा व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा

गंगावेश येथील चहा व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा

sakal_logo
By

44420
रस्त्यात सापडलेली
तीस हजारांची बॅग परत
गंगावेस येथील चहा व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा
कोल्हापूर, ता. २० ः रस्त्यात सापडलेली तीस हजारांची बॅग गंगावेस येथील श्री राम नाश्ता सेंटरचे रामा चांदम यांनी प्रामाणिकपणे परत केली. त्याबद्दल त्यांच्यासह अण्णा दरवान यांचा न्यू शिवनेरी मित्र मंडळ आणि शिवगणेश मंदिरातर्फे सत्कार झाला. शुक्रवार पेठ परिसरातील एक ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका पेन्शनची तीस हजारांची रक्कम असलेली बॅग घेऊन गंगावेस परिसरातून निघाल्या होत्या. या दरम्यान त्यांची बॅग गहाळ झाली. रामा चांदम यांना ही बॅग रस्त्यात सापडल्यावर त्यांनी ती बॅग स्वतःकडे ठेऊन कोणाची आहे का विचारले. परंतु कोणीच नसल्यामुळे त्यांनी ती बँग स्वतःकडे ठेवली व ही बाब दरवान पान शॉपचे अण्णा दरवान व इतर मित्रांना सांगितली. त्यानंतर दोन तासाने संबंधित शिक्षिकेचे कुटुंबीय गहाळ बॅग शोधत असल्याचे लक्षात आले. त्यांची ओळख पटवून श्री. चांदम व श्री. दरवान यांनी ही बॅग परत दिली. प्रामाणिकणाबद्दलची बक्षीसीही त्यांनी विनम्रपूर्वक नाकारली. ही माहिती शिवगणेश मंदिराच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी दोघांनाही शिवगणेश मंदिरात निमंत्रित केले आणि यथोचित गौरव केला. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष गजानन समंग, अभिजित डुबल, राजेंद्र काळेबेरे, दीपक नलवडे, अमित सरवळकर, नंदकुमार रेळेकर, मोहन सरवळकर आदी उपस्थित होते.