गड-निर्भय मॉर्निंग वॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-निर्भय मॉर्निंग वॉक
गड-निर्भय मॉर्निंग वॉक

गड-निर्भय मॉर्निंग वॉक

sakal_logo
By

44478
गडहिंग्लज : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक करताना अंनिस व परिवर्तनवादी संघटनांचे कार्यकर्ते.


गडहिंग्लजला निर्भय मॉर्निंग वॉक
गडहिंग्लज, ता. २० : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची येथील शाखा व परिवर्तनवादी संघटनांतर्फे आज पहाटे निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंदोलन झाले. दाभोलकर यांच्या खून करणाऱ्या सूत्रधारांना अटक करावी आणि मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
एम. आर. हायस्कूलपासून सकाळी सहाला मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. कडगाव रोड, संकेश्वर रोड, वीरशैव चौक, बाजारपेठ, नेहरू चौक, महालक्ष्मी मंदिर, लक्ष्मी रोडवरून रॅली दसरा चौकात आली. या दरम्यान कार्यकर्त्यांनी चळवळीतील विविध गाणी गायली. डॉ. दाभोलकर अमर रहे, पानसरे अमर रहे, डॉ. कलबुर्गी अमर रहे, गौरी लंकेश अमर रहे, विचारवंतांच्या खुन्यांना फाशी झालीच पाहिजे, आदी घोषणा दिल्या.
प्रा. आशपाक मकानदार म्हणाले, ‘डॉ. दाभोलकरांच्या खुनाला नऊ वर्षे झाली. तरी त्याचे सूत्रधार तपास यंत्रणांना सापडत नाहीत. शासनाने जादूटोणा विरोधी कायदा आणला; पण त्याचे नियम अजून तयार केलेले नाहीत. या बाबी निषेधार्ह आहेत.’ राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. शिवाजी होडगे, प्रा. आर. बी. कांबळे, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, प्राचार्य साताप्पा कांबळे, अशोक मोहिते, बाळासाहेब मुल्ला, उज्ज्वला दळवी, सरोजिनी कदम, वसुंधरा सावंत, रमजान अत्तार, बाळेश नाईक, डॉ. डी. जी. चिघळीकर, श्रीरंग राजाराम, दस्तगीर मुल्ला आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे यांनी आभार मानले.