छायाचित्र दिन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र दिन कार्यक्रम
छायाचित्र दिन कार्यक्रम

छायाचित्र दिन कार्यक्रम

sakal_logo
By

44510

छायाचित्रदिनानिमित्त
छायाचित्रकारांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध संस्था, संघटना व पक्षांतर्फे छायाचित्रकारांचे सत्कार, व्याख्यान असे कार्यक्रम झाले. कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे करवीर नगर वाचन मंदिरमध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कॅमेरा पूजन झाले. तसेच ज्येष्ठ छायाचित्रकारांचे सत्कार झाले. यात शशिकांत ओऊळकर, अरुण महिंद्रकर, विजय महिंद्रकर, जीवनसिह रजपूत, प्रकाश मिसाळ यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरवले. खासदार महाडिक यांनी छायाचित्रणाची आवड मनोगतातून व्यक्त केली. अनिल वेल्हाळ यांचे (पक्षी) आणि मोहन सुतार यांचे (ग्रामीण जीवन) या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी सत्यजित कदम, संस्थेचे अध्यक्ष संजीव देवरुखकर, उपाध्यक्ष संजय जोशी, सचिव किशोर पालोजी, महेश बागे, प्रसाद बेंद्रे उपस्थित होते. शिवसेनेतर्फे खरी कॉर्नर परिसरातील बाबूराव पेंटर कॅमेरा स्तंभासमोर विविध वृत्तपत्रात काम करणाऱ्या छायाचित्रकारांचा सत्कार झाला. ‘सकाळ’चे छायाचित्रकार व प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, नितीन जाधव यांचा सत्कार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले व सुनील मोदी यांच्या हस्ते झाला. मोहन मेस्त्री यांनी आभार मानले. या वेळी महेश सावंत, विजय जाधव, निखिल रोडे उपस्थित होते.