अंध युवक मंच पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंध युवक मंच पत्रकार परिषद
अंध युवक मंच पत्रकार परिषद

अंध युवक मंच पत्रकार परिषद

sakal_logo
By

येई गणेशा - लोगो

44545
दिव्यांग बांधवांना मिरवणुकीत स्थान देऊया
सोशल मीडियावरून आवाहन; अंध युवक मंचसह इतर टीमही सज्ज
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः कोरोनामुळे दोन वर्षांनी यंदा गणेशोत्सव दिमाखात साजरा होणार आहे. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसह उत्सव काळात दिव्यांग बांधवांच्या विविध कलाविष्कारांना स्थान देऊन त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन आता सोशल मीडियावरून होऊ लागले आहे. दरम्यान, अंध युवक मंचसह इतर टीमही गणेशोत्सवासाठी सज्ज झाल्या आहेत.
अंध युवक मंचचाच विचार केला तर मंचची नवरंग वाद्यवृंद, शिव हिरा बेंजो पार्टी आहे. या माध्यमातून अंध कलाकार लावणी, मराठी भावगीते, भक्तिगीते, हिंदी - मराठी गाणी, नवीन फिल्मी गीते सादर करतात. साधारण साडेतीन तासांचा कार्यक्रम हे अंधकलाकार सादर करतात. अंध युवक मंच गेली १४ वर्षे अंधासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे अंध व्यक्तींकरिता कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक पुनर्वसन हे उपक्रम राबविले जातात. यामध्ये अंधाच्या क्रिकेट, गायन स्पर्धा घेतल्या जातात. संस्थेचे राजोपाध्येनगर येथे निवासी वसतिगृह आहे. येथे सध्या २५ अंध विद्यार्थी विनामूल्य शिक्षण घेत आहेत. ही इमारतही भाडेतत्त्वावर चालते. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने येथील सर्व खर्च भागवला जातो. मात्र, त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे आगामी गणेशोत्सव, नवरात्रौत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीत या मंचच्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी द्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संजय ढेंगे, अजय वणकुद्रे यांनी केले आहे.