सदभावना दौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदभावना दौड
सदभावना दौड

सदभावना दौड

sakal_logo
By

44518

राजीव गांधी सद्‍भावना दौड जयघोषात
...................
उदंड प्रतिसाद ः श्रीमंत शाहू महाराज, प्रदेशाध्यक्ष थोरात यांची उपस्थिती
..........
कोल्हापूर, ता. २० ः स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस व आमदार पी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने दसरा चौक ते दिंडनेर्ली मार्गावर काढलेल्या सद्‍भावना दौडला उदंड प्रतिसाद मिळाला. दौडचे हे २९ वे वर्ष असून आजच्या या दौडमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार प्रा. जयंत आसगांवकर, राजू आवळे, तसेच ऋतुराज पाटील सहभागी झाले होते.
धनगरी ढोल, झांज पथकाच्या गजरात ही दौड निघाली. ‘जब तक सूरज, चाँद रहे, राजीवजी आपका नाम रहे’, ‘अमर रहे राजीव गांधी अमर रहे’ च्या जयघोषात ही दौड निघाली. सकाळी ११ वाजता दसरा चौक येथील शाहू बोर्डिंगमधून दौडला सुरूवात झाली. माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. दसरा चौक ते बिंदू चौक, मिरजकर तिकटी, पाण्याचा खजिना, संभाजीनगर, कळंबा ते दिंडनेर्ली येथील राजीवजी सूतगिरणीपर्यंत ही दौड काढण्यात आली. दौडसाठी सकाळी नऊ वाजल्यापासूनच जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते दसरा चौकात एकत्र येत होते.
यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, ॲड. गुलाबराव घोरपडे, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राहुल पाटील, श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे, संध्या घोटणे, भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, ॲड. सुरेश कुराडे, बबनराव रानगे आदी सहभागी झाले होते.
..................