तुषार गांधी यांचे आज व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुषार गांधी यांचे आज व्याख्यान
तुषार गांधी यांचे आज व्याख्यान

तुषार गांधी यांचे आज व्याख्यान

sakal_logo
By

७१०१०
तुषार गांधी यांचे आज व्याख्यान
कोल्हापूर ः येथील पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्टच्या वतीने उद्या (रविवारी) जगन फडणीस स्मृती शोधपत्रकारिता पुरस्काराचे वितरण होणार आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे ‘गांधीजींच्या हत्येनंतर ७५ वर्षांनी त्यांची आपल्याला आवश्यकता आहे का?’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दिल्लीतील इतिहास संशोधक अशोककुमार पांडेय यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाचला कार्यक्रम होणार असून सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान, श्री. गांधी व श्री. पांडेय यांच्याशी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये वार्तालाप होणार आहे.