जिल्ह्यातील १३ गावांमध्ये शंभर टक्के बायोगॅस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील १३ गावांमध्ये शंभर टक्के बायोगॅस
जिल्ह्यातील १३ गावांमध्ये शंभर टक्के बायोगॅस

जिल्ह्यातील १३ गावांमध्ये शंभर टक्के बायोगॅस

sakal_logo
By

00654-1
जिल्ह्यात १३ गावांत १०० टक्के बायोगॅस
पर्यावरणपूरक प्रकल्प; अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा स्वयंपाकासाठी उपयोग
ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः बायोगॅस हा अपारंपरिक ऊर्जास्त्रोताचा उत्तम पर्याय आहे. म्हणूनच शासनाकडून बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. जिल्हा परिषदेने सर्व गावात बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी दोन दशकांपासून प्रबोधन केले आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि जलजीवन मिशन यांनी बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न केले. त्यामुळेच आज जिल्ह्यातील १३ गावांत घरोघरी शंभर टक्के बायोगॅस प्रकल्प उभारले असून त्यातील बहुतांशी बायोगॅसना घरातील शौचालयेही जोडली आहेत.
जिल्ह्यातील गावांत घरोघरी गाई, म्हशींचा गोठा आहे. शेणापासून बायोगॅस निर्मितीही केली जाते. जिल्ह्यात सुमारे १ लाख २० हजार बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत. त्यातील ९९ हजार ६५० बायोगॅसना शौचालये जोडली आहेत. दोन दशकांपासून जिल्हा परिषदेचा कृषी विभाग याबाबत प्रबोधन करत असून त्यामुळे घरोघरी बायोगॅस प्रकल्प झाले आहेत. या बायोगॅस प्रकल्पांचा ग्रामीण महिलांना इंधनासाठी चांगलाच लाभ झाला असून त्यांची घरगुती गॅसची गरज पूर्ण झाली आहे. शौचालय जोडलेल्या बायोगॅसचे प्रमाण जिल्ह्यात अधिक असून देशातील ते एकमेव उदाहरण ठरले आहे. जिल्ह्यातील १३ गावे अशी आहेत जेथे प्रत्येक घरात बायोगॅस आहे. या गावांनी शंभर टक्के बायोगॅसचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा अधिकाधिक वापर करून उर्जेची गरज पूर्ण करणे हे पर्यावर्णीय दृष्टिकोनातूनही लाभदायक आहे. अनेक सकारात्मक गोष्टींमध्ये कोल्हापूर राज्यात अग्रेसर असून बायोगॅस प्रकल्प उभारणीतही जिल्ह्याचे राज्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शंभर टक्के बायोगॅस असणारी गावे
मोरेवाडी (आजरा), महालवाडी (भुदरगड), मोरेवाडी (चंदगड), धुंडेवाडी/चौधरवाडी, हेळेवाडी (गडहिंग्लज), निलेवाडी (हातकणंगले), शेळकेवाडी (करवीर), फराकटेवाडी (कागल), कुंभारवाडी, महाडिकवाडी (पन्हाळा), बरगेवाडी (राधानगरी), लाटवाडी (शिरोली), काटाळेवाडी (शाहूवाडी).

कोट
पारंपरिक ऊर्जास्त्रोत म्हणून बायोगॅसकडे पाहिले जाते. यामुळे ऊर्जेची गरज पूर्ण होतेच शिवाय त्याचा पर्यावर्णावरही कोणताही विपरीत परिणाम होत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शौचालये जोडली आहेत. त्यामुळे मैला गाळ व्यवस्थापन करणेही शक्य झाले आहे. सर्वच बायोगॅस प्रकल्पांना शौचालये जोडले जावीत असा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे.
- प्रियदर्शनी मोरे प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जिल्हा परिषद