निर्भय वॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्भय वॉक
निर्भय वॉक

निर्भय वॉक

sakal_logo
By

४४५७५

44478
गडहिंग्लज : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक करताना अंनिस व परिवर्तनवादी संघटनांचे कार्यकर्ते.

‘इन्कलाब झिंदाबाद’ने दुमदुमला परिसर
------------
कदमवाडी, गडहिंग्लजला निर्भय मॉर्निंग वॉक; दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश हत्येचा निषेध

कोल्हापूर, ता. २० ः ज्येष्ठ विचारवंत शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, शहीद गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज कदमवाडी परिसरातून निर्भय वॉक उपक्रम झाला. ‘इन्कलाब झिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. परिसरातील शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनीही या उपक्रमात सहभागी झाल्या. चळवळीची विविध गीते सादर करतानाच हा लढा तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी झाला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष सरोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी आठ वाजता मॉर्निंग वॉकची सुरुवात झाली. कदमवाडी, माझी शाळा, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सदर बाजार मुख्य मार्ग, राजर्षी शाहू कॉलेज या मार्गावरून हा उपक्रम झाला. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनिल चव्हाण यांचे ‘विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजची परिस्थिती’ या विषयावर सप्रयोग व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. एल. डी. कदम होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विलासराव पोवार, डॉ. छाया पोवार, अनिल चव्हाण, सीमा पाटील, वसंतराव पाटील, साधना देसाई, विजय भोगम, रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, मेघा पानसरे, संजय कळके, रमेश वडणगेकर, किरण गवळी, सुरेश जत्राटकर, संजय सौंदलगे, संजय सुळगावे, अजित चव्हाण, सुनंदा चव्हाण, व्यंकापा भोसले, सतीश चंद्र कांबळे, संभाजी जगदाळे, चंद्रशेखर बटकडली, प्रशांत आंबी, वसंतराव पाटील, भरत लाटकर, अभिषेक मिठारी आदी उपस्थित होते. प्रा. के. व्ही. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. बी. बी. घुरके यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. एस. एम. गोजारे यांनी आभार मानले. ज्योती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, प्रबुद्ध हायस्कूल, शाहू कॉलेज, विवेकानंद कॉलेज येथे विवेक वाहिनी उपक्रमाला प्रारंभ झाला.

---
गडहिंग्लज : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची येथील शाखा व परिवर्तनवादी संघटनांतर्फे आज पहाटे निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंदोलन झाले. दाभोलकर यांच्या खून करणाऱ्या सूत्रधारांना अटक करावी आणि मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
एम. आर. हायस्कूलपासून सकाळी सहाला मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. कडगाव रोड, संकेश्वर रोड, वीरशैव चौक, बाजारपेठ, नेहरू चौक, महालक्ष्मी मंदिर, लक्ष्मी रोडवरून रॅली दसरा चौकात आली. या दरम्यान कार्यकर्त्यांनी चळवळीतील विविध गाणी गायली. प्रा. आशपाक मकानदार म्हणाले, ‘डॉ. दाभोलकरांच्या खुनाला नऊ वर्षे झाली. तरी त्याचे सूत्रधार तपास यंत्रणांना सापडत नाहीत. शासनाने जादूटोणा विरोधी कायदा आणला; पण त्याचे नियम अजून तयार केलेले नाहीत. या बाबी निषेधार्ह आहेत.’ राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. शिवाजी होडगे, प्रा. आर. बी. कांबळे, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, प्राचार्य साताप्पा कांबळे, अशोक मोहिते, बाळासाहेब मुल्ला, उज्ज्वला दळवी, सरोजिनी कदम, वसुंधरा सावंत, रमजान अत्तार, बाळेश नाईक, डॉ. डी. जी. चिघळीकर, श्रीरंग राजाराम, दस्तगीर मुल्ला आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे यांनी आभार मानले.