शहरात सोमवारी पाणी नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात सोमवारी पाणी नाही
शहरात सोमवारी पाणी नाही

शहरात सोमवारी पाणी नाही

sakal_logo
By

शहरात उद्या
पाणीपुरवठा
बंद राहणार
कोल्हापूर, ता. २० : बालिंगा जल उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामामुळे सोमवारी (ता. २२) शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत बालिंगा व नागदेववाडी जल उपसा केंद्रावरून पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे बालिंगा जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागांना दैनंदिन पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
शहरातील ए, बी, वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरातील लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरुजी परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजी पेठ परिसर, चंद्रेश्वर गल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भागांचा समावेश आहे. संपूर्ण सी, डी वॉर्डमधील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वर पेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रह्मपुरी परिसर, बुधवार पेठ तालिम परिसर, सिद्धार्थनगर परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवारपेठ चौक परिसर, सोमवार पेठ परिसर, ट्रेझरी ऑफिस परिसर, बिंदू चौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी, देवल क्लब, तसेच ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी पाचवी, सहावी, सातवी, आठवी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक परिसरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.