गोकुळ बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ बातमी
गोकुळ बातमी

गोकुळ बातमी

sakal_logo
By

४४५८४

गोविंदा पथकांना
‘गोकुळ’कडून ताकद
अरुण डोंगळे ः मुंबईत दहीहंडी आयोजकांचा सत्कार
कोल्हापूर, ता. २० : श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने साजऱ्या करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई व उपनगरांमधील ठाणे, चेंबूर दहीहंडी कार्यक्रमस्थळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व ज्येष्‍ठ संचालक अरुण डोंगळे व संचालकांनी भेटी दिल्‍या. आयोजकांसह गोविंदा पथकांचे सत्कारही यावेळी झाले.
अरुण डोंगळे म्हणाले, ‘गोकुळ’चे आणि गोविंदा पथकाचे ऋणानुबंध हे फार जुने आहेत. कित्येक वर्ष ‘गोकुळ’ दहीहंडी आयोजक मंडळांना सहकार्य करत असते. ‘गोकुळ’चे दूध व दुग्धजन्य पदार्थ हे गोविंदा पथकांना ऊर्जा देण्याचे काम करतात. मुंबर्इ व उपनगरातील ग्राहकांचे गोकुळच्या दुधावर विशेष प्रेम आहे. भविष्‍यात मुंबई उपनगरातील दूध विक्री वाढेल, या दृष्टीने प्रयत्नशील आहे.’’
दहीहंडी आयो‍जक व गोविंदा पथकांनी विशेष सहकार्याबद्दल ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व सर्व संचालकांचे आभार मानले. संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे,‍ शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, बयाजी शेळके, वाशी शाखा व्‍यवस्‍थापक दयानंद पाटील आदी उपस्थित होते.