१०८ रूग्णवाहिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१०८ रूग्णवाहिका
१०८ रूग्णवाहिका

१०८ रूग्णवाहिका

sakal_logo
By

पेठवडगावातील जखमीवर
वेळीच उपचार झाल्याने पाय वाचले
----------------------
१०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टर पायलटची प्रसंगावधान राखत मदत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे पायाला गंभीर जखम होऊन पडलेल्या व्यक्तीला १०८ रुग्णवाहिकेतील डॉ. प्रियंका घाटगे व पायलट सुरेश पाटील यांनी सीपीआरमध्ये दाखल केले. त्यामुळे वेळीच उपचार झाल्याने गंभीर जखमीचे दोन्ही पाय वाचण्यास मदत झाली.
वडगाव शहरात एका व्यक्तीच्या दोन्ही पायाला भरपूर जखमा होऊन त्यातून दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे या जखमीला कोणीही हात लावू शकत नव्हते. त्या जखमीला चालताही येत नव्हते. ही माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने हातकणंगलेच्या १०८ रुग्णवाहिकेस कळवली. या रुग्णवाहिकेत डॉ. प्रियंका घाटगे व पायलट सुरेश पाटील यांनी प्रसंगावधान राखत धाव घेतली. ‘त्या’ जखमी व्यक्तीला प्राथमिक उपचार रुग्णवाहिकेतच सुरू केले. तसेच रुग्णवाहिका सीपीआरमध्ये आणली. येथे जखमीला दाखल केले. त्या डॉक्टर व पायलटच्या कौतुकास्पद कामगिरीने जखमीचे दोन्ही पाय वाचले.

वेळीच उपचाराने पाय झाले बरे
पायाला गँगरिन झाल्यामुळे जखमेतून दुर्गंधी येत होती. रुग्णवाहिकेत जखमीला घातल्यानंतर रुग्णवाहिकेतही दुर्गंधी पसरली. अशा अवस्थेतही डॉ. प्रियंका व पायलट सुरेश यांनी प्रथमोपचार करण्याबरोबर वेळेत दवाखान्यात दाखल केले. दुसऱ्या दिवशी जखमीचे नातेवाईक दाखल झाले. जखमी व्यक्तीचे पाय घुशीने किंवा उंदराने चावल्याने डॉक्टरांनी दोन्ही पाय काढावे लागतील, असे सांगितले होते. मात्र, त्या जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे जखमीवर वेळीच झालेल्या उपचाराने दोन्ही पाय वाचले आहेत.