अपर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची वाणवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची वाणवा
अपर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची वाणवा

अपर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची वाणवा

sakal_logo
By

अपर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची वानवा
इचलकरंजीत २५ जणांची आवश्‍यकता; नायब तहसीलदार पद रिक्त
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २१ ः मंडल कार्यालय, २० गावांचा महसुली भार तसेच एक महापालिका, नगरपालिका यांचा कारभार चालत असलेले इचलकरंजी शहरातील अपर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. कार्यालयाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सुमारे २५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र सध्या हे कार्यालय केवळ ८ कर्मचाऱ्‍यांवर सुरू आहे. नायब तहसीलदार पदाच्या २ जागा आवश्यक असताना त्या रिक्त आहेत. त्यामुळे तीन वर्षांपासून कार्यालयाचा भार मोजक्याच कर्मचाऱ्‍यांवर पडत आहे. परिणामी, या कर्मचाऱ्‍यांना अति कामाचा ताण सहन करावा लागत आहे.
शहरातील जुन्या पालिका इमारतीत सप्टेंबर २०१९ मध्ये अपर तहसील कार्यालय सुरू केले. कार्यालयाच्या अधिकार कक्षेत हुपरी, रुई, कबनूर आणि इचलकरंजी ही चार मंडल कार्यालय येतात. तर यांच्या अंतर्गत चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी, हुपरी, रेंदाळ, तिळवणी, साजणी, जंगमवाडी, पट्टणकडोली, रुई, इंगळी आदीसह एकूण २० गावांचा समावेश आहे. त्यामुळे इचलकरंजीसह ५ लाख नागरिकांची कामे येथील कार्यालयांमधून होत आहेत. सध्या या सर्व नागरिकांचा भार केवळ ८ कर्मचाऱ्यावर येऊन ठेपला आहे. परिणामी बहुतांशी वेळ कार्यालयामधील कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादी होतांना दिसते.
हातकणंगले कार्यालयाच्या अधिकर क्षेत्रातील काही गावांचे कामकाज इचलकरंजी कार्यालयामधून होणार असल्याचे कळताच समस्यांचे जलद निरासन होऊन वेळ व पैशांची बचत होईल, अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र २०१९ नंतर सुमारे आठ महिने कार्यालयाचे कामकाज अपर तहसीलदार व लिपिक हे दोघेच पाहत होते. त्यामुळे नागरिकांना पुन्हा हातकणंगले कार्यालयाच्या फेऱ्‍या माराव्या लागत होत्या. सध्या इचलकरंजी कार्यालयाचे कामकाज समाधानकारक असले तरी अपुऱ्या कर्मचाऱ्‍यांची उणीव भासत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मात्र प्रत्यक्ष नेमणूक कधी होते याबाबतची प्रतीक्षा आहे.
------
कर्मचाऱ्‍यांच्या नियुक्तीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. सध्या कार्यालयात असलेल्या स्टाफमधील सात कर्मचारी हातकणंगले कार्यालयाकडून तापुरत्या नियुक्त्यांवर वर्ग केला आहे. इचलकरंजी कार्यालयाचे वाढते कामकाज पाहता आवश्यक पदे मंजूर करण्याची गरज आहे.
ृ-शरद पाटील, अपर तहसीलदार
----

६० टक्के कामाचा भार
हातकणंगले तहसील कार्यालय अधिकार कक्षेमधील गावांची संख्या अधिक असली तरी लोकसंख्या अधिक असलेल्या गावांचा समावेश इचलकरंजी कार्यालयामध्ये झाला आहे. त्यामुळे हातकणंगले तहसील कार्यालयावर सुमारे ४० टक्के भार आहे. ६० टक्के भार इचलकरंजी अपर तहसील कार्यालयावर असताना कर्मचारी मात्र अपुरे आहेत.
---
मनुष्यबळ दृष्टिक्षेप
पद*आवश्यक कर्मचारी* सध्याचे कर्मचारी
तहसीलदार*१*१
नायब तहसीलदार*२*०
अव्वल कारकून*५*२
लिपिक*१५*४
शिपाई*३*१
एकूण*२६*८

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88984 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..