इचलकरंजीत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण
इचलकरंजीत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण

इचलकरंजीत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण

sakal_logo
By

इचलकरंजीत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण
इचलकरंजी, ता. २१ : इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विदयार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होण्यासोबत सामाजिक भान निर्माण होईल. शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्याचबरोबर रोटरीसुद्धा इंटरॅक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कार्य करीत आहे, असे उद्‌गार प्रा. अशोक दास यांनी काढले. ते रोटरी क्लब पुरस्कृत शहर व परिसरातील विविध हायस्कूलमधील इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. रोटरीचे इंटरॅक्ट चेअरमन वीरेंद्र देशमाने इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून उपस्थित होते.
देशमाने यांनी इंटरॅक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणते काम करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक, इत्यादीसारख्या सामाजिक नियमांचे पालन करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, स्वच्छता राखणे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनही चांगले सामाजिक कार्य करता येईल, असे सांगितले. कार्यक्रमात शहरातील इचलकरंजी हायस्कूल, तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, दि न्यू हायस्कूल, भारती हायस्कूल, गंगामाई गर्ल्स हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, सुलतानपूरे हायस्कूल, रा. छ. शाहू हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल तसेच डॉ. डी. एस. बरगाले हायस्कूल शिरदवाड, कबनूर हायस्कूल कबनूर या हायस्कूलमधील इंटरॅक्ट क्लबचे नूतन अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना मावळते अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्याकडून पदभार सोपवला. रोटरी क्लब सेंट्रलतर्फे सात गरजू विद्यार्थ्यांना सायकल प्रदान केल्या. अशोक जैन, डॉ. प्रशांत कांबळे, छगनलाल मेहता, श्रीकांत राठी, संजय होगाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88989 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..