ऑनलाईन स्पर्धेतील विजेते बक्षीसांच्या प्रतिक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन स्पर्धेतील 
विजेते बक्षीसांच्या प्रतिक्षेत
ऑनलाईन स्पर्धेतील विजेते बक्षीसांच्या प्रतिक्षेत

ऑनलाईन स्पर्धेतील विजेते बक्षीसांच्या प्रतिक्षेत

sakal_logo
By

ऑनलाईन स्पर्धेतील
विजेते बक्षिसांच्या प्रतीक्षेत
दोन वर्षांपासून गडहिंग्लज पालिकेचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : येथील नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व कोविड जनजागृती अंतर्गत ऑनलाईन चित्रकला, ऑडिओ जिंगल आणि लघुपट स्पर्धा घेतल्या. विजेत्यांची घोषणाही केली. त्याला दोन वर्षे उलटली असून विजेत्यांना पालिकेकडून बक्षिसे कधी मिळणार, असा प्रश्‍न निवेदनातून विचारला आहे.
येथील ‘समथिंग वेगळं’ ग्रुपचे पृथ्वीराज बारामती, स्वप्नील असोदे, साहिल दुधी, चेतन खातेदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालिकेला निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, पालिकेकडून सप्टेंबर २०२० मध्ये कोरोना-माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. तीन प्रकारच्या या स्पर्धेतील विजेते पालिकेने नोव्हेंबरमध्ये घोषित केली. विजेत्यांना रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र अशी बक्षिसे जाहीर केली होती. परंतु, दोन वर्षे उलटली तरी अद्याप विजेत्यांना बक्षिसे मिळालेली नाहीत. बक्षिसाबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून कोणतेच उत्तर मिळत नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहराने चांगली कामगिरी केली आहे. त्यात जनतेचे योगदान मोठे आहे. पालिकेच्या स्पर्धांना चांगला प्रतिसादही मिळतो. परतु, बक्षिसेच न दिल्याने विजेत्यांमध्ये नाराजी आहे. पालिकेने तातडीने ही बक्षिसे विजेत्यांना पोहच करावीत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89063 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..