दीपक केसरकर यांचे स्टेटमेंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपक केसरकर यांचे स्टेटमेंट
दीपक केसरकर यांचे स्टेटमेंट

दीपक केसरकर यांचे स्टेटमेंट

sakal_logo
By

फोटो घेणे

कायद्यानुसारच मूर्ती
विसर्जन ः केसरकर
ःइचलकरंजीत पंचगंगा प्रदूषण होऊ देणार नाही
सावंतवाडी, ता. २१ : ‘‘इचलकरंजी येथे पंचगंगा नदीमध्ये गणेश विसर्जन करण्याबाबतचा निर्णय प्रशासन, लोकप्रतिनिधी व स्थानिक जनता यांची मते विचारात घेऊन आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहूनच घेतला जाईल. कोणताही वाद होणार नाही, यासाठी माझे प्रयत्न असतील’’ अशी ग्वाही पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच इचलकरंजी येथे गणेश विसर्जन पंचगंगा नदीत करायचे की शहापूर खणीतच करायचे यावरून चर्चा सुरू आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी पर्यावरण मंत्री केसरकर यांची नुकतीच मुंबईत भेट घेऊन पंचगंगा प्रदूषणाबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जनाचा आग्रह धरला आहे.
याबाबत आज ‘सकाळ’ने मंत्री केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘पंचगंगा प्रदूषणासंदर्भात आमदार आवाडे मला भेटले. त्यावेळी गणपती विसर्जनाबाबत सविस्तर चर्चा झाली नाही. त्या ठिकाणी नेमका कशामुळे प्रश्न निर्माण झाला आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मी पुन्हा एकदा आमदार आवाडे, स्थानिक प्रशासन तसेच जनता आणि कायद्याची बाजू समजून घेऊन त्यातून योग्य मार्ग काढेन. गणपती विसर्जनासाठी महापालिका, स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती वेगळी व्यवस्था केली जाते. त्यामुळे वाद होत नाहीत. इचलकरंजीतही मतभेद होऊ नये, अशी अपेक्षा आहे. शेवटी कायद्याला धरूनच निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे चर्चेतून आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून हा विषय सोडविला जाईल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89137 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..