डिगे फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिगे फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार
डिगे फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार

डिगे फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

44746

जिद्द, मेहनतीने सर्व साध्य करता येते
टेनिसपटू ऐश्वर्या जाधव; डिगे फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : ‘‘जिद्द आणि मेहनतीने सर्व काही साध्य करता येते. प्रत्येकाने ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे’’, असे मत टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिने प्रकट मुलाखतीत व्यक्त केले.
माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनतर्फे समाजातील १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, १४ वर्षांखालील टेनिसपटू ऐश्वर्या, पॅरास्विमर अन्नपूर्णा कांबळे यांचा सत्कार झाला. शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. अध्यक्ष सदानंद डिगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
माजी महापौर निलोफर आजरेकर, कागलच्या उपकोषाधिकारी विद्या महाजन, हेमलता कुर्डुकर, सुजाता भास्कर, छाया वर्धन, ग्रामपंचायत सदस्या नंदा सरदेसाई, ‘हिंदकन्या’च्या अधीक्षक वंदना सम्राट यांच्या हस्ते पदक, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल गौतम वर्धन यांचाही सन्मान केला.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. ऐश्‍वर्याने देश-परदेशातील अनुभव मनोगतात मांडले. डिगे म्हणाले, ‘‘ऐश्वर्या जाधव, अन्नपूर्णा कांबळेसह गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी डिगे फाउंडेशन खारीचा वाटा म्हणून नेहमी मदत करेल.’’ गौतमी वर्धन यांचे भाषण झाले.
अशोक भास्कर, प्रभाकर कांबळे, तानाजी घरपणकर, पी. डी. सरदेसाई, संजय कुडुकर, स्वाती काळे, सुनील गायकवाड उपस्थित होते. प्रशांत चुयेकर, संजय कुटुंकर यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89140 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..