शेतकरी संघटने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी संघटने
शेतकरी संघटने

शेतकरी संघटने

sakal_logo
By

४४७५१
प्रोत्साहनपर अनुदानासाठी उपोषण
रघुनाथदादा पाटील : १० सप्टेंबरपर्यंत रक्कम द्यावी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करा, गुऱ्हाळ घरांना चालना मिळाली पाहिजे, तसेच, प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळाले नाही तर दसरा चौक येथे आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज दिला. मार्केट यार्ड येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘दोन साखर कारखान्यामधील अंतराच्या अट रद्द झाली तर साखर कारखानदारांत ऊस घेण्याची स्पर्धा लागणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे व शेतकऱ्यांना जादा दर मिळणार आहे. कोल्हापूर जिल्हा गूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. देशात नावलौकिक आहे. ऊस कारखानदारांना स्वस्तात उपलब्ध व्हावा, म्हणूनच गुऱ्हाळ घरे संपवण्याचा घाट सरकारने घातला आहे.’’ जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे म्हणाले, ‘‘सरकारने घोषित केलेले प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे सानुग्रह अनुदान १० सप्टेंबरच्या आत द्यावे.’’ या वेळी जिल्हाध्यक्ष माणिक पाटील, संजय रावळ, टी. आर. पाटील, गुणाजी शेलार, बाळ नाईक, शंकर बावडेकर, डी. के. कोपर्डीकर, बाळासाहेब मिरजे, राजू खुर्दळी, प्रदीप कांबळे, गोरख चंदनशिवे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89165 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..