ई- पिक नोंदणीचे व्यंकटराव, आजरा महाविद्यालयात धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई- पिक नोंदणीचे व्यंकटराव, आजरा महाविद्यालयात धडे
ई- पिक नोंदणीचे व्यंकटराव, आजरा महाविद्यालयात धडे

ई- पिक नोंदणीचे व्यंकटराव, आजरा महाविद्यालयात धडे

sakal_logo
By

44763
आजरा : येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये ई-पीकविषयी माहिती देताना तलाठी शिवराज देसाई. व्यासपीठावर मंडल अधिकारी जी. बी. पाटील, तलाठी भारती पोवार, प्राचार्य खोराटे.

ई-पीक नोंदणीचे व्यंकटराव,
आजरा महाविद्यालयांत धडे
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ : शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कोणती पिके घेतली आहेत. त्या पिकांची नोंद सातबारावर होणे आवश्यक असते. दरवर्षी महसूल यंत्रणेतर्फे याची नोंद घातली जाते. पूर्वी तलाठी प्रक्षेत्रावर जाऊन पिकांची पाहणी करून सातबारावर नोंद घालत होते. सध्या राज्यशासने ई-पीक पाहणी व्हर्जन-२ हे अॅप तयार केले असून, शेतकरी खातेदारींनी आपल्या पिकांची नोंद अॅपवर करावी याबाबतचे मार्गदर्शन व्यंकटराव हायस्कूल व आजरा महाविद्यालयात विद्यार्थांना देण्यात आले.
आजरा सजाचे तलाठी शिवराज देसाई यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी निवासी नायब तहसीलदार डी. डी. कोळी, मंडल अधिकारी जी. बी. पाटील, पेरणोलीच्या तलाठी भारती पोवार आदींनी सहभाग घेतला. व्यंकटराव हायस्कूलमध्ये प्राचार्य खोराटे, आजरा महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एन. एस. सादळे प्रमुख उपस्थित होते.
तलाठी देसाई म्हणाले, ‘‘अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, पीक विमा, पीक कर्ज, जमीन खरेदी-विक्री, शासकीय योजना, वीज जोडणी यासह अन्य अनुषंगिक गोष्टीमध्ये याचा वापर होणार असल्याने शेतकऱ्यांनी याचे महत्त्व ओळखून ई-पीक पेरा नोंदवून शासनाला सहकार्य करावे.’’ या वेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89175 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..