जगन फडणीस पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगन फडणीस पुरस्कार
जगन फडणीस पुरस्कार

जगन फडणीस पुरस्कार

sakal_logo
By

44778

पंच्याहत्तर वर्षांनंतरही गांधींच्या विचारांची गरज
तुषार गांधी ः अशोककुमार पांडेय यांचा जगन फडणीस स्मृती पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतानाच अजूनही या देशात दलितांवर अन्याय होतात, काही ठिकाणी तर पाण्यालाही हात लावू दिला जात नाही, वेगाने पसरत चाललेला धार्मिक आणि जातीय व्देष हे तर देशासमोरचे मोठे आव्हान बनले आहे, या साऱ्या पार्श्वभूमीवर पंच्याहत्तर वर्षानंतरही महात्मा गांधी यांच्या विचारांची देशाला नितांत गरज असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले. येथील पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे आयोजित जगन फडणीस स्मृती शोधपत्रकारिता पुरस्काराचे वितरण आज त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, दिल्लीचे इतिहास संशोधक अशोककुमार पांडेय यांना यंदाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
श्री. गांधी यांनी ‘गांधीजींच्या हत्येनंतर पंच्याहत्तर वर्षांनी त्यांची आपल्याला आवश्यकता आहे का?’ या विषयावर संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘पुरोगामी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक भाषा, प्रांतवादाचा व्देष पसरवला जात आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या, आयुष्य खर्ची घातलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान आहे. तो तितक्याच प्रेमाने आपण त्यांना दिला का?, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.’’
देशभरातील विविध घटना, घडामोडींचाही आढावा घेत त्यांनी वर्तमानावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘अजूनही आपल्याला गांधीजी पूर्णपणे कळलेच नाहीत. त्यांची तीन माकडंही आपण सोईस्कररित्या वापरतो. समाजातील अन्यायी कायद्यांविरोधात असो किंवा एकूणच अन्यायाविरोधात, वाईटावर बोलायला कुणी धजत नाही. अशावेळी ‘मी काही पाहिले नाही, ऐकले नाही आणि बोललोही नाही’, अशी भूमिका समाजच घेत असेल तर मग परिस्थिती कशी बदलणार? एखाद्या गावात दलित समाजातील लहान मुलाची हत्या होते, आजही काही गावात दलितांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. दलित समाजातील मुलगा लग्नात घोड्यावरून गेला म्हणून त्याची हत्या केली जाते. हे प्रकार आजही राजरोस सुरू आहेत आणि म्हणूनच गांधी विचार पूर्णपणे समजून घेणे गरजेचे आहे.
अशोककुमार पांडेय म्हणाले, ‘‘महात्मा गांधी यांनी सद्मावना, अहिंसेचा आग्रह धरताना जातीववादाविरोधात नेहमीच खमकी भूमिका घेतली. किंबहुना किमान त्यांचे हे तीन विचार तरी प्रत्येकाने समजून घ्यायला हवेत. नव्या पिढीने तर रोज गांधी विचारांचा जागर केला पाहिजे.’’
कार्यक्रमात डॉ. सुजाता पांडेय यांचा सत्कार सुजाता पाटील यांच्या हस्ते झाला. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी पुरस्कारामागील भूमिका त्यांनी सांगितली. डॉ. ओमप्रकाश कलमे, ट्रस्टचे विश्वस्त व ‘सकाळ''चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते. निशिकांत चाचे यांनी आभार मानले. डॉ. ऋषीकेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

.......
कोल्हापूरचा आदर्श
विविध विधायक कामांबरोबरच क्रांतीकारी निर्णयांचा आदर्श कोल्हापूरने नेहमीच दिला आहे. ही परंपरा अधिक नेटाने पुढे सुरू राहिली पाहिजे, अशी अपेक्षा अशोककुमार पांडेय यांनी व्यक्त केली. जगन फडणीस यांचे साहित्य हिंदी भाषेत प्रकाशित करण्यासाठीही सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89202 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..