मोबाईल चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा
मोबाईल चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा

मोबाईल चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा

sakal_logo
By

मोबाईल चोरीप्रकरणी
अल्पवयीनसह तिघांवर गुन्हा

कोल्हापूर, ता. २१ ः रिक्षा ढकलण्याचा बहाणा करून मोबाईल आणि ब्ल्यूटूथ चोरल्याच्या संशयावरून आज तिघांवर गुन्हा दाखल केला. याची फिर्याद पप्पू राजाराम बिस्कू (वय २३, संभाजीनगर, मूळ - झारखंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला गेला. जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू सेंट्रिंग कामगार आहेत. शनिवारी (ता. २०) संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते मंगळवार पेठेतील जुने आधार हॉस्पिटलसमोरून चालले होते. यावेळी साहिल आणि रोहन (पूर्ण नाव उपलब्ध नाही) तेथे आले. आमची ॲपे रिक्षा बंद पडली असून ढकलण्यास मदत करा, अशी विनंती त्यांनी पप्पू यांना केली. पप्पू त्यांच्यासोबत रिक्षा ढकलण्यासाठी गेले. या संधीचा फायदा घेऊन दोघांनी त्यांच्याकडील ११ हजारांचा मोबाईल आणि ४०० रुपयांचे ब्ल्यूटूथ काढून घेतले. त्यांना शिवीगाळ केली व ते तेथून निघून गेले. याची तक्रार पप्पू यांना जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. साहिल आणि रोहन या दोन संशयित आरोपींबरोबर आणखी एका अल्पवयीन मुलाचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांकडे असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89206 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..