लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनी, वाकलेले खांब दुरुस्त करावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनी,
वाकलेले खांब दुरुस्त करावेत
लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनी, वाकलेले खांब दुरुस्त करावेत

लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनी, वाकलेले खांब दुरुस्त करावेत

sakal_logo
By

44836
कोवाड : बसर्गे येथे दूरध्वनीच्या खांबाला स्पर्श झालेली वीजवाहिनी काठीच्या सहाय्याने बाजूला करताना माणगावचे उपसरपंच बाबू दुकळे व शेतकरी.

लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या,
वाकलेले खांब दुरुस्त करावेत
---
चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांतून मागणी
कोवाड, ता. १ : ऑगस्टच्या सुरुवातीलाच जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाचा शेतातून गेलेल्या वीजवाहिनींच्या खांबांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी खांब वाकले आहेत. वीजवाहिन्या लोंबकळत आहेत. झाडा-झुडपांचा वीजवाहिन्यांना स्पर्श होत आहे. त्यामुळे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या व वाकलेल्या खांबांची दुरुस्ती करावी, अशी मागणी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात चंदगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त होता. यामुळे शेतातून गेलेल्या वीजवाहिन्यांचे खांब अनेक ठिकाणी वाकले आहेत. वीजवाहिन्याही लोंबकळत आहेत. झाडा-झुडपांच्या फांद्यांचाही वीजवाहिनींना स्पर्श झालेला आहे. काही वीजवाहिन्यांवर उच्चदाबाचा वीजपुरवठा सुरू आहे; तर काही ठिकाणी मध्यम दाबाच्या वीजवाहिन्या आहेत. कृषिपंपांच्या वीजवाहिन्यांच्या ठिकाणी हे प्रमाण जास्त आहे.
दोन वर्षांपूर्वी कागणी येथे शेतात तुटून पडलेल्या वीजवाहिन्यांमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. वाकलेले खांब व लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांबाबत कोवाड, कागणी, किणी, नागरदळे येथील शेतकऱ्यांनी अनेकदा आवाज उठवला होता. ‘महावितरण’चे उपअभियंता विशाल लोदी यांनी तत्काळ हा प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन दिले होते. पण, आजही कागणीच्या शिवारात वाकलेले खांब दिसतात. अशा खांबांमुळे त्या शेतकऱ्यांनी त्या शेतातून उसाचे पीक घेणे बंद केले आहे. ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी शेतातून वाकलेले खांब व लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या सरळ करून धोका हटवावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
---------------
कोट
गेल्या दोन वर्षांपासून ट्री कटिंगचे काम केले नसल्याने अनेक ठिकाणी झाडा- झुडपांच्या फांद्यांचा वीजवाहिन्यांना स्पर्श झाला आहे. वीजवाहिन्या लोंबकळत आहेत. यामुळे शेतातून काम करताना शेतकऱ्यांना भीती वाटते. ‘महावितरण’ने ट्री कटिंगचे काम पूर्ण करावे.
- संजय कुट्रे, शेतकरी, किणी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89266 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..