रस्ता दुरुस्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता दुरुस्तीची मागणी
रस्ता दुरुस्तीची मागणी

रस्ता दुरुस्तीची मागणी

sakal_logo
By

44840
-------
रस्ता दुरुस्तीची मागणी
इचलकरंजी : शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी केतन गुजर यांच्याकडे केली. शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे शहरात वाहनधारकांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने गणेश मंडळांना मिरवणुकीसाठी खराब रस्त्यांमुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तत्काळ खड्डे बुजवावेत, अन्यथा १५ सप्टेंबरनंतर खड्डे दिसतील तेथे खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. बसगोंडा बिरादार, अभिषेक पाटील, हेमंत वनकुंद्रे, महंमद मुजावर, धुळगोंडा पाटील, बाळासो कदम, सुशांत दरिबे, श्रीपाल दरिबे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89272 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..