हद्दवाढ बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दवाढ बैठक
हद्दवाढ बैठक

हद्दवाढ बैठक

sakal_logo
By

44927
कोल्हापूर : येथे सोमवारी झालेल्या सर्व पक्षीय कृती समितीच्या बैठकीत बोलताना आर. के. पोवार. शेजारी दिलीप देसाई, ॲड. बाबा इंदूलकर, ॲड. गिरीश खडके, ॲड. विवेक घाटगे, ॲड. महादेवराव आडगुळे, बाबा पार्टे, मारुतराव कातवरे, अशोक भंडारे आदी. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

आता गाजर नको, आदेश काढा
हद्दवाढ कृती समिती; येत्या ११ च्या मेळाव्यात रणशिंग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः खोटी आश्‍वासने, चर्चा, प्रस्ताव भरपूर झाले. शासनाने आता निर्णयाचे गाजर दाखवणे बंद करून हद्दवाढीचा आदेश काढावा. त्यासाठी रस्त्यावरील लढाईची वेळ आली असून, आंदोलन सुरू करण्याचा निर्धार शहर, जिल्हा नागरी सर्व पक्षीय कृती समितीच्या आज झालेल्या बैठकीत करण्यात आला. येत्या ११ सप्टेंबरला व्यापक मेळावा घेऊन रणशिंग फुंकण्याचा निर्धारही झाला. खंडपीठासाठीही जे काही करावे लागेल, त्यासाठी कृती समितीसोबत असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

निमंत्रक आर. के. पोवार यांनी हद्दवाढीसाठी आणखी किती दिवस थांबायचे, असा सवाल करत सरकार कोणाचे आहे, याच्याशी देणे-घेणे नसून आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक नको, अशी भूमिका मांडली. ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, ‘‘पूर्वीच्या प्रस्तावांचे काय केले, हे आधी सरकारने सांगावे. नवीन प्रस्ताव पाठवायला सांगून गाजर दाखवले जात आहे. सभागृह नसल्याने प्रशासकांनी सर्व पक्षीयांच्या भावना समजून घ्याव्यात. सरकारकडून निर्णय करून घेण्यासाठी आता रस्त्यावरील लढाई केली पाहिजे. त्यासाठी आंदोलनाचे टप्पे जाहीर केले जावेत.’’
दिलीप देसाई म्हणाले, ‘‘प्रथम प्राधिकरण रद्द करावे. त्याशिवाय हद्दवाढ होणार नाही. शासनाने हद्दवाढ, खंडपीठासाठी परिपत्रक काढावे.’’ महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विवेक घाटगे यांनी खंडपीठाचा प्रश्‍न महिनाभरात सुटण्याच्या मार्गावर आहे. हद्दवाढीबाबत अनंत चतुर्दशीनंतर व्यापक मेळावा घेऊन आंदोलनाचे टप्पे जाहीर करण्याची गरज व्यक्त केली. राजू जाधव यांनी टीका केली, की मंत्री, खासदार, आमदार शहरात राहतात व हद्दवाढीला विरोध करतात. त्यांच्याकडूनच विरोध करण्यासाठी फूस लावली जाते. संदीप देसाई यांनी रस्त्यावर लढाई करण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करावे, असे सुचवले.
दिलीप पोवार यांनीही आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्याची मागणी केली. सुभाष देसाई यांनी मंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू दिला नाही, तरच हद्दवाढीचा निर्णय होईल, असे सांगितले. किशोर घाटगे यांनी सरकारशी चर्चा करून मागण्यांबाबत पाठपुरावा करू, शहरात एक व गावात एक अशी भूमिका घेणाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची गरज व्यक्त केली. अनिल कदम, सुभाष जाधव, पूजा साळोखे यांनीही मते व्यक्त केली. बाबा पार्टे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. महादेवराव आडगुळे यांनी आभार मानले. ॲड. विवेक घाटगे, ॲड. प्रशांत चिटणीस यांचा सत्कार झाला. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, मारुतराव कातवरे, अशोक भंडारे, संभाजी जगदाळे, विवेक कोरडे आदी उपस्थित होते.

देखाव्यासाठी दहा हजार
गणेशोत्सवात जी मंडळे हद्दवाढीचा देखावा करतील, त्यांची स्पर्धा घेऊन प्रथम क्रमांकासाठी दहा हजार रुपयांचे बक्षीस ॲड. बाबा इंदूलकर यांनी जाहीर केले. तसाच देखावा ग्रामीण भागातही केल्यास बक्षीस दिले जाईल, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89320 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..