श्रावण सोमवारसाठी शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावण सोमवारसाठी शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी
श्रावण सोमवारसाठी शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी

श्रावण सोमवारसाठी शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी

sakal_logo
By

44930

‘ओम नम: शिवाय’चा गजर
चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : चौथ्या श्रावण सोमवारी शहरातील शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. आज शेवटचा श्रावण सोमवार होता. विशेष म्हणजे, यावर्षी चौथ्या श्रावण सोमवारी अदा एकादशी होती. शिवपूजनाबरोबर हा योगायोग जुळून आला. उत्तरेश्‍वर पेठ, अंबाबाई मंदिराजवळील काशिवि‍श्‍वेश्वर, अतिबलेश्‍वर, शाहू स्टेडियमच्या बाजूला असलेले रावणेश्‍वर, कपिलतीर्थ मंडईतील कपिलेश्‍वर, कैलासगडची स्वारी मंदिराबरोबर शहरातील शिवमंदिरात ‘ओम नम: शिवाय:, शिवहर शंकर नमामी शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो,’चा जप भाविकांनी केला. जपाबरोबर ध्यानधारणा, शिवग्रंथांचे वाचन केले.
रावणेश्‍वर मंदिरातील पुजारी ओंकार भोरे म्हणाले, ‘पहाटे शिवपिंडीवर रुद्राभिषेक झाला. यानंतर रामेश्‍वर ज्योतिर्लिंग रुपातील पूजा मांडली होती. अशोक भोरे, जय भोरे आणि मी स्वत: ही पूजा मांडली. दिवसभर शिवदर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पूजेचे साहित्य विक्रेत्यांनी मांडले होते. बिल्वदल, नारळ, कापूर, उदबत्ती, फुले, तेल, जवस आदी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. घरातील शिवलिंगाची पूजा केली. ज्यांच्या घरातील देव्हाऱ्यात दगडी, पारद किंवा तांब्याचे शिवलिंग उपलब्ध नव्हते, त्यांनी शिवाच्या प्रतिमेचे पूजन केले. पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढूनही पूजा केली. एकादशी तिथी असल्याने श्री महाविष्णूचेही स्मरण केले. आज एकादशी व्रत असल्याने सकाळी स्नान करून ध्यान, सूर्यनारायणाला जल अर्पण केले. कन्हेरीची पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळे फळ जसे की, केळी, पिवळे मिष्ठान्न अर्पण केले. भगवान महाविष्णूची पूजा केली.


२९ जुलैला श्रावण मासारंभ झाला होता. पहिला श्रावणी सोमवारी (ता. १), दुसऱ्या (ता. ८), तिसरा (ता. १५) आणि आज चौथा (ता. २२) श्रावण सोमवार झाला. प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवामूठी वाहिली. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस वाहिले. पाचवा सोमवारी शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे; मात्र शेवटचा श्रावणी सोमवार शनिवारी (ता. २७) श्रावण अमावस्या आहे. यानंतर श्रावण महिना समाप्त होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89357 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..