टुडे ३ स पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३ स पटा
टुडे ३ स पटा

टुडे ३ स पटा

sakal_logo
By

तरुणींनी स्वसंरक्षणासाठी
निर्भयपणे यावे ; मनिषा नारायणकर
शाहुनगर ः जीवनातील प्रत्येक संकटाशी धैर्याने तोंड देत महाविद्यालयीन तरुणींनी स्वसंरक्षणासाठी निर्भयपणे पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करवीर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मनिषा नारायणकर यांनी केले. कुरूकली (ता.करवीर) येथील भोगावती महाविद्यालयात झालेल्या मुलींच्या संरक्षणासाठीच्या उपाय योजना या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ.डी.ए.चौगले अध्यक्षस्थानी होते. यावेळी नारायणकर यांनी शालेय मुलींच्या संरक्षणाबाबत निर्भया पथकाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच मुलींनी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी द्याव्यात, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ.चौगले यांनी विद्यार्थिनींनी शैक्षणिक गुणवत्ता बरोबरच संरक्षणाच्या दृष्टीने स्वतःला सक्षम बनवावे असे आवाहन केले. पर्यवेक्षक प्रा.आर.व्ही.गायकवाड यांनी आभार मानले.यावेळी उपप्राचार्य आर.बी.हंकारे, डॉ.एन.एम.पाटील,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबुराव घोरपडे, नाझनिन देसाई, तब्बसूम पठाण, प्रा.अनुराधा पाटील, प्रा.सुनिता आवळे, प्रा.शीतल माळकर, प्रा.स्वाती पाटील ,प्रा.उज्वला कांबळे,प्रा.ऋतुजा गोनुगडे, प्रा.सुजाता चांदणे उपस्थित होते.


जखमी वानराला पिल्लासह जीवदान
माजगाव ः माजगाव(ता.पन्हाळा) येथे एका वानराच्या कळपातील मादी वानर पिलासह जमिनीवर कोसळून जखमी झाले. युवकांनी जखमी वानराला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून जीवदान दिले. तसेच पुढील उपचारासाठी या जखमी वानराला पिल्लासह कळे वनविभागाचे वनरक्षक बाजीराव देसाई व वनसेवक निवृत्ती चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. संजय कदम व विश्वास चौगले यांच्या घरावरून हा कळप उड्या मारून जात असताना कळपातील मादी वानर पिल्लासह जमनीवर पडून जखमी झाले. संजय कदम यांच्या जनावरांच्या ठेवले.पिल्लासह वानर जखमी झाल्याची माहिती ''सकाळ'' बातमीदार सागर चौगले यांनी वनपाल नाथाजी पाटील यांना कळवली. काही वेळात वनपाल पाटील यांनी जखमी वानराला कळे येथे पुढील उपचारासाठी नेले. जखमी वानराला पिल्लासह वनविभागाकडे देऊन जीवदान दिले

00535
अध्‍यक्षपदी दीपक पाटील
असळज ः निवडे (ता.गगनबावडा) येथील शाळा व्‍यवस्‍थापन समितीच्‍या अध्‍यक्षपदी दीपक राजाराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
शाळा व्‍यवस्‍थापन समितीतील अन्‍य सदस्‍ असे- सुरेखा पाटील, अनुराधा पाटील, अश्विनी पाटील, सरिता डेंगळे, महादेव पाटील, सागर पाटील, पांडुरंग पाटील, सुनील पाटील, रेश्मा चिटणीस, सचिव मुख्‍याध्‍यापक सौ डोईफोडे. सरपंच दगडू भोसले व पालक उपस्थित होते. शिक्षक पटले यांनी स्‍वागत केले.संदीप पाटील यांनी आभार मानले.

00532
00533
महादेव संस्थेच्या अध्यक्षपदी पाटील
असळज : अणदूर (ता.गगनबावडा) येथीलमहादेव विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बजरंग ज्ञानू पाटील यांची तर उपाध्यक्षपदी राजाराम आनंदा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश तिवारी यांनी काम पाहीले. शिवाजी गोविंद पाटील, कोंडीराम नानू पाटील, मारुती गोविंद पाटील, म्हादू बापू पाटील, सहदेव लहू पाटील, विलास बाळकू पाटील, सिताराम राऊ पाटील, संजय पांडुरंग गुरव, साऊ भागोजी बोडेकर, हौसाबाई बाबू रावण, शालाबाई रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते. सचिव सुनिल पाटील यांनी आभार मानले.

राजे ट्रस्टतर्फे वारकरयांचा सन्मान
पोले तर्फ ठाणे ः येथे राजे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे झालेल्या रक्तदान शिबीर व वारकरी सन्मान सोहळा उत्साहात झाला. स्वस्मे स्वल्प समाजाय सर्वस्व हे ब्रीद वाक्य अंगीकृत करून, नेहमीच समाज कार्याची तळमळ असणाऱ्या व पोर्ले पंचक्रोशीत सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या, राजे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वातंत्र्याचा अमृतमोहस्तव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना व क्रांतिकरांना मानवंदना देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ३२ वर्ष भारतीय सेने मध्ये सेवा बजावणारे श्री भगवान बोळावे यांना आमंत्रित केले होते.
गावातून २१ दिवस पायी चालत पंढरीची वारी करणाऱ्या ३३ वारकर्यांना सन्मानपत्र व झाडे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिरात २३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट, भगवतगीता, शिवस्मारक प्रतिमा व गौरवपत्र आदी भेट वस्तू दिल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश काशिद, उपाध्यक्ष सौरभ चौगुले, कार्याध्यक्ष संदीप चेचर, खजानीस सौरभ धनगर, सेक्रेटरी ऋतुराज काशिद, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.


01243
पोर्ले तर्फ ठाणे ः शेतकरयांतर्फे दत्त दालमिया कारखान्याला संग्राम पाटील यांना निवेदन देताना करणसिंह सरनोबत, सतिश सरनोबत, चैतन्य सरनोबत, शहाजी जाधव आदी.

‘दत्त दालमिया‘ कारखान्याला निवेदन
पोर्ले तर्फे ठाण : येथील दत्त दालमिया कारखान्याला विविध मागण्यांचे निवेदन आसुर्ल-पोर्ले परिसरातील शेतकरी व युवकांनी कारखान्याचे असिसंट जनरल मॅनेजर (केन) संग्राम पाटील यांना करणसिंह सरनोबत, प्रकाश देशमुख, चैतन्य सरनोबत यांनी दिले. निवेदनात असे म्हटले आहे, आसुर्ले पोर्ले परिसरातील ८0 टक्के युवकांना नोकरीत सामावून घ्यावे, कंत्राटी कामगारांना नियमानुसार हजेरी द्यावी, कामाचे ठेके स्थानिक लोकांना द्यावे, सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करुन घ्यावे, ऊस वाहतूक दर इतर कारखान्या प्रमाणे द्यावा,उसाला वाढीव दर द्यावा.यावेळी सतिश सरनोबत, शहाजी जाधव,अभय नलवडे,खंडु पाटील, सरदार पाटील, महादेव सरनोबत आदी उपस्थित होते.

भोगावतीत दुर्मिळ कोयरा मासा
कुडित्रे ः खुपिरे (ता. करवीर) येथील भोगावती नदीत कोयरा जातीचा दुर्मिळ मासा कोळ्याला सापडला. २६ किलो वजन आणि पाच फूट उंची होती. मासा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. खुपिरे येथील कोळी शशिकांत आंनदा गवळी, नितीन व ओंकार गवळी यांनी आज पहाटे भोगावती नदीत शिंदेवाडी परिसरात नदीत गळ टाकले होते. साडेनऊ वाजता गळाला मोठा मासा लागल्याचे निदर्शनास आले. तिघांनीही शिताफीने मासा बाहेर काढला. हा मासा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उडाली. हा मासा गोड्या पाण्यात आढळतो. सुमारे ४० ते ५० किलोपर्यंत वजन होते. माशाची पैदास कमी असते. दरम्यान जिल्हा भोई समाजाचे संचालक नामदेव तिकोणे म्हणाले, ‘‘शिंगणापूर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला असे मासे सापडतात. या माशांची पैदास कमी आहे, माशांचे संवर्धन तलावात करणे गरजेचे आहे. नैसर्गिक पद्धतीने पैदास वाढली पाहिजे. हा मासा मांसाहारी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89372 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..