पतसंस्थांच्या सभा एकत्रितपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतसंस्थांच्या सभा एकत्रितपणे
पतसंस्थांच्या सभा एकत्रितपणे

पतसंस्थांच्या सभा एकत्रितपणे

sakal_logo
By

44958
कोल्हापूर : जिल्हा शासकीय आरोग्यसेवा कर्मचारी/अधिकारी सहकारी पतसंस्थेतर्फे मुलांना बक्षीस वाटप करताना उपस्थित मान्यवर.

शासकीय आरोग्यसेवा कर्मचारी,
अधिकारी पतसंस्थेची सभा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्यसेवा कर्मचारी/अधिकारी सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सभेत १५ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येईल, असे अध्यक्ष धनाजी जाधव यांनी जाहीर केले. सभेपुढील विषय मंजुरीसाठी व्यवस्थापक महेंद्र पांडव यांनी मांडले. त्याला सर्वानुमते मंजुरी दिली. सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार संस्थापक मधुकर पाटील, राजर्षि शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस्‌ बँकेचे उपाध्यक्ष रमेश घाटगे यांच्या हस्ते झाला. संचालक अनिल खटावकर, महेश मुळे, अमोल भोसले, मारूती चव्हाण, सदाशिव पाटील, संचालिका अंजली देवरकर, संगिता आळतेकर, विमल कलकुटकी, दिलीप ठोंबरे, अशोक बने, प्रमोद वडणेरकर उपस्थित होते. संचालिका पल्लवी रेणके यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विजयकुमार खांडेकर यांनी आभार मानले.
...
44960
कोल्हापूर : श्री बाल हनुमान पतसंस्थेत ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करताना आमदार ऋतुराज पाटील.

ज्येष्ठ सभासदांचा सत्कार
कोल्हापूर : श्री बाल हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेत वार्षिक सभेनिमित्त विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण, संस्थेस ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ७५ वर्षावरील सभासदांचा सत्कार झाला.आमदार ऋतुराज पाटील, अध्यक्ष अमर समर्थ, सर्व संचालकांच्या हस्ते सत्कार झाले. तज्ज्ञ संचालिका सविता पाटील यांची रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार झाला. संस्थेस ‘अ’ वर्ग मिळाला असून ठेवी १३ कोटी रुपये आहेत. एन.पी.ए. प्रमाण शुन्य टक्के असून, २३ लाख रुपये नफा झाला, असे संचालक नारायण पाटील यांनी सांगितले. समर्थ यांनी संस्थेच्या ७५ वर्षाच्या कारर्किदीबाबत माहिती दिली. सी.ई.ओ. प्रिया चरणे उपस्थित होते. संचालक संभाजी आरेकर यांनी स्वागत केले
...
भारत क्रेडिट सोसायटीची सभा
कोल्हापूर : भारत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्ष दिपक शिंदे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. भारत मंदिर कार्यालयात सभा झाली. स्मिता जाधव यांनी अहवाल वाचन केले. सचिव नितीन पोवार यांनी सभा नोटीसीचे वाचन केले. २०२१-२२ करीता संस्थेला लेखापरिक्षण ‘अ’ वर्ग मिळाला. उपाध्यक्ष सविता जाधव यांनी १२ टक्के लाभांश जाहीर केला. संचालक अतुल कारंडे, उदय सावंत यांनी सभासदांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. बाबासो पाटील, अनिल इंगवले, सुमन वाडेकर, शिवाजी जाधव उपस्थित होते.
...
मातोश्री वृध्दाश्रमात सत्कार
कोल्हापूर : साहित्यिका सरोज भगवान, मालोजी केरकर, शोभा भोळे, रेखा खेर यांच्यासह आश्रम निवासी ज्येष्ठ महिला-पुरुषांचा शिंगणापूर रोड, चंबुखडी मातोश्री वृद्धाश्रम येथे उद्योगपती लालुभाई छाब्रिया, गंगाभाभी झंवर, मंजू छाब्रिया यांच्या हस्ते सत्कार झाला. भगवान यांनी वयाच्या ९० व्या वर्षी आपला वाचन आणि लेखनाचा छंद जोपासला. तसेच नेहमीच वाचनाने आपले आरोग्य चांगले राहते, असे सांगितले. आश्रमाच्या अध्यक्ष वैशाली राजशेखर, सुर्यप्रभा चिटणीस, संभाजी साळोखे उपस्थित होते.
...
‘मनसे’तर्फे लाडू वाटप
कोल्हापूर : श्रावण सोमवारनिमित्त मनसे विद्यार्थी सेनेतर्फे महादेव मंदिर येथे लाडू वाटप केले. उपशहर प्रमुख अजिंक्य शिंदे, मंदार पाटील, तेजस शिंदे, पृथ्वीराज घोडके, संकेत पाटील, वैभव अस्वले, पार्थ भोसले, कार्यकर्ते उपस्थित होते.
...
44987
कोल्हापूर : आर. एस. तथा नाना बेरी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना महेश सुर्वे.

आर्किटेक्टस, इंजिनीअर्सनी
समाजाला योग्य दिशा द्यावी

सुर्वे;असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस्‌चा वर्धापन

कोल्हापूर, ता. २२ : ‘‘आर्किटेक्टस आणि इंजिनिअर्सनी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करावे,’’ असे ‘इरिगेशन सर्कल’चे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी सांगितले.
असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस्‌ ॲन्ड इंजिनिअर्सच्या 52 व्या वर्धापनदिनानिमित्त असोसिएशनच्या कार्यालयात सुर्वे यांच्या हस्ते असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष इंजिनिअर्स/आर्किटेक्ट आर. एस. तथा नाना बेरी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. डॉ. किरण सुर्यवंशी (गडहिंग्लज) यांनी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेसरय्या यांचे प्रतिमेचे अनावरण केले. राजेंद्र सावंत अध्यक्षस्थानी होते. माजी अध्यक्ष रमेश पोवार लिखित ‘आठवणीतील कोल्हापूर’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. संजय घोडावत विद्यापीठ, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, डेक्कन कॉलेज ऑफ इंटेरियर डिझाईन यांच्याबरोबर सामंजस्य करार केला.
चंदाराणी पाटील, पूजा जैन, मधुरा पाटील, प्रियंका पवार, नील पाटील, श्रुती तांदळे यांना प्रातिनिधिक स्वरुपात सभासद प्रमाणपत्र दिले. सुनील मांजरेकर यांचा विशेष सत्कार झाला. संस्थेचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
संचालक अनिल घाटगे, विजय पाटील, प्रमोद पवार, अंजली जाधव, प्रशांत पत्की, प्रशांत काटे, निशांत पाटील, उमेश कुंभार, डेक्कन कॉलेजचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, प्राचार्य सीमा मलानी उपस्थित होते. सचिव राज डोंगळे यांनी स्वागत केले. विजय चोपदार यांनी सूत्रसंचलन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89413 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..