सकाळ इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा
सकाळ इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा

सकाळ इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा

sakal_logo
By

44959
44964
‘सकाळ- एनआयई’तर्फे
रविवारी इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा
-
प्रवेश विनामूल्य, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : शालेय विद्यार्थ्यांतील कलात्मक गुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यातील पर्यावरणविषयक जाणिवा समृद्ध करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या न्यूजपेपर इन एज्युकेशन-‘एनआयई’तर्फे रविवारी (ता. २८) इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा होणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा?, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. त्याशिवाय सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
दरम्यान, डीवायपी सिटी मॉलमध्ये सकाळी आठ ते साडेअकरा या वेळेत ही कार्यशाळा होणार असून शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश असेल.
डीवायपी सिटी प्रस्तुत या कार्यशाळेसाठी माधव मिशन सहप्रायोजक आहे. आठ ते पंधरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आहे. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती कशी बनवावी?, याचे प्रात्यक्षिक दळवीज् आर्टस इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी देणार असून विद्यार्थ्यांना स्वतःच्या हातांनी मूर्ती साकारायची आहे. त्यासाठी माती व इतर साहित्य विद्यार्थ्यांना पुरवले जाणार असून पट्टी, आईस्क्रिम काडी, पाणी बॉटल, लहान पॅड किंवा बोर्ड, हात पुसण्यासाठी कापड, टूथ स्टीक आदी साहित्य विद्यार्थ्यांनी आणायचे आहे.
* कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी ९७६४६४७४३०, ९५५२५८१९१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89414 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..