सर्कीट बेंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्कीट बेंच
सर्कीट बेंच

सर्कीट बेंच

sakal_logo
By

४४९९८
कोल्हापूर ः केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री एस. पी. बाघेल यांना सोमवारी सर्किट बेंचबाबत निवेदन देताना बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके. शेजारी ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. विवेक घाटगे, ॲड. प्रकाश मोरे, ॲड. राजेंद्र किंकर, खासदार धनंजय महाडिक, ॲड. संतपतराव पवार-पाटील, ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख, ॲड. धनंजय पठाडे आदी.

कोल्हापुरात सर्किट बेंचसाठी
राज्य सरकारकडे पाठपुरावा
एस. पी. बाघेल; खंडपीठ कृती समितीला दिले आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूरची सर्किट बेंचची मागणी मजबूत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री या नात्याने राज्य सरकारकडे पाठपुरवा करू, असे आश्वासन केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री एस. पी. बाघेल यांनी आज येथे दिले. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता खंडपीठ कृती समितीने शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते.
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. डॉ. संतोष शहा म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायायाचे कोल्हापुरात सर्किंट बेंच व्हावे, ही गेली ३८ वर्षांची मागणी प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्याबरोबर मार्चमध्ये खंडपीठ कृती समितीची बैठक झाली होती. सर्किट बेंच स्थापनेबाबत राज्य शासनाने ठराव केलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी सर्किट बेंच स्थापनेबाबत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्रदेखील पाठवले आहे. कोल्हापूरपासून मुंबईचे अंतर जास्त आहे. पक्षकारांना होणारा खर्च पडवणारा नाही. कोल्हापुरात सर्किट बेंच झाल्यास जलद, कमी खर्चात न्याय मिळेल.’’
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘सहा जिल्ह्यांतील सर्वसामान्य जनता, पक्षकारांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंच होणे आवश्यक आहे, तरी आपण केंद्रीय न्याय व विधी मंत्री या नात्याने यासाठी पाठपुरावा करावा.’’ कोल्हापुरातील सर्किट बेंच मागणी भौगोलिकदृष्ट्या योग्य व मजबूत आहे. मेरठ, जलपैगुडी, धारवाड (कर्नाटक) येथे सर्किट बेंच स्थापन झाले. त्यानुसार कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन होणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळातर्फे त्यांना सांगण्यात आले.
बागेल म्हणाले, ‘‘मुंबई येथे जाण्या-येण्याचा खर्च मोठा आहे. सर्वसामान्यांना जलद व स्वस्त न्याय मिळणे गरजेचे आहे. कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू करण्याला पोषक वातावरण आहे. न्याय व्यवस्थेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित कामांचा व्याप पाहता कोल्हापुरात सर्किट बेंच होणे आवश्यक आहे. केंद्रीय राज्यमंत्री या नात्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. जिल्हा बार असोसिएशनतर्फे कोल्हापुरात डी. आर. टी. ट्रिब्युनल, एन. सी. एल. टी. ट्रिब्युनल, आर्बिट्रेशन अँड मेडिएशन सेन्टर, कनिष्ठ वकिलांना विद्यावेतन मिळावे, ग्रंथालयास निधी मिळावा आदी विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष ॲड. विवेक घाटगे, बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव अडगुळे, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. संपतराव पवार, ॲड. प्रकाश मोरे, ॲड. अजित मोहिते, ॲड. धनंजय पठाडे, ॲड. राजेंद्र किंकर, ॲड. सुशांत चेंडके, ॲड. बिंदगे, ॲड. विवेक शुक्ल, ॲड. अजित मोरबाळे, ॲड. मिलिंद जोशी, ॲड. गुरुप्रसाद माळकर, ॲड. विजय महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिक्कोडे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, भगवान काटे आदींसह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89421 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..