गिजवणेत मे मध्ये महालक्ष्मी यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिजवणेत मे मध्ये महालक्ष्मी यात्रा
गिजवणेत मे मध्ये महालक्ष्मी यात्रा

गिजवणेत मे मध्ये महालक्ष्मी यात्रा

sakal_logo
By

गिजवणेत मे मध्ये महालक्ष्मी यात्रा
गडहिंग्लज, ता. २२ : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या तारखा आज निश्‍चित करण्यात आल्या. २ ते ४ मे २०२३ दरम्यान ही यात्रा होत आहे. २८ एप्रिल रोजी इरडे पडण्याचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, गावात आता यात्रेच्या तयारीला वेग येणार आहे.
गिजवणेच्या महालक्ष्मीची यात्रा १७ वर्षानंतर होत आहे. त्यामुळे गावात उत्साही वातावरण आहे. ग्रामदैवत श्री केदारलिंग यात्रा ६ ते ८ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. त्यानंतर महिन्यानी महालक्ष्मी यात्रेच्या तारखा निश्‍चित केल्या आहेत. शुक्रवारी (२८ एप्रिल) इरडे पडणे व धार्मिक सोहळा होईल. मंगळवारी (२ मे) धार्मिक विधी व रात्री लक्ष्मी मूर्ती खेळविण्याचा सोहळा होईल. बुधवारी (३ मे) नैवेद्य व देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. गुरुवारी (४ मे)
दुपारी धार्मिक विधी आणि सायंकाळी श्री लक्ष्मी पावन सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेच्या तयारीसाठी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांची धावपळ उडणार आहे. यात्रेसाठी आठ महिन्यांचा कालावधी असला तरी आतापासूनच टप्प्याटप्प्याने तयारीला वेग येणार आहे. दरम्यान, मंदिराचे शिखर व सांस्कृतिक हॉल बांधकामास लवकरच प्रारंभ करण्यात येणार असून भाविकांनी देणगी देवून सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा समितीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89432 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..