- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

44986


रस्ते दुरुस्तीसाठी पावणे दोनशे कोटी द्या
आमदार पाटील, मुश्रीफ यांची मागणी; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
कोल्हापूर, ता. २२ ः पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी कोल्हापूर महापालिकेला ५० कोटी, इचलकरंजी महापालिकेला २५ कोटी आणि जिल्ह्यातील अन्य रस्त्यांसाठी १०० कोटी, असा १७५ कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, प्रा. जयंत आसगावकर यांच्यासह भेट घेऊन निवेदन दिले. कामांसाठी तत्काळ २५ कोटी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहेत. नागरिकांबरोबरच पर्यटकांचीही मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. १०० कोटींची आवश्यकता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता नागरिकांना मूलभूत सुविधा व इतर विकास कामे करणे अडचणीचे होत आहे. इचलकरंजी हे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अतिवृष्टीमुळे दोन्ही महापालिका क्षेत्रातील रस्ते खराब झाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ५० कोटी, तर इचलकरंजीसाठी २५ कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी २५ कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे सांगितले. कोकणाला जोडणाऱ्या वैभववाडी, गगनबावडा रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचीही विनंती करण्यात आली. निवेदनावर आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, प्रा. जयंत आसगावकर, जयश्री जाधव, राजेश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शहरासाठी ५ कोटी
निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी दूरध्वनीवरून तातडीने संपर्क साधला. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश देत त्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89433 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..