दमसा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दमसा पुरस्कार
दमसा पुरस्कार

दमसा पुरस्कार

sakal_logo
By

४४९७९

‘दमसा’चे पुरस्कार जाहीर
जाधव, सातपुते, साळुंखे, हळदीकर आदींचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२२ : येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे देण्यात येणाऱ्या २०२१ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी विजय जाधव, नीरज साळुंखे, शिवाजी सातपुते, रघुनाथ कडाकणे, रमजान मुल्ला, चंद्रकांत खामकर, संजय हळदीकर आदींच्या पुस्तकांची निवड झाली. १८ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात वितरण होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली.
दरम्यान, परीक्षक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे, प्रा.वैजनाथ महाजन, प्रसाद कुलकर्णी, डॉ. आलोक जत्राटकर, गौरी भोगले यांनी काम पाहिले.

पुरस्कारप्राप्त पुस्तक आणि लेखक
देवदत्त पाटील पुरस्कार: विजय जाधव (पाऊसकाळ, कादंबरी ), शंकर खंडू पाटील पुरस्कार: चंद्रकांत खामकर (कोरोनाकांड, कथासंग्रह),
अण्णा भाऊ साठे पुरस्कार: नीरज साळुंखे (स्वराज्यनिर्माते शाहजी महाराज, आत्मचरित्र), कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार (रघुनाथ कडाकणे-उदाहरणार्थ कोसलाआणि कॅचर इन द राय, संकीर्ण), शैला सायनाकर पुरस्कार (शिवाजी सातपुते -दखल बेदखल, कवितासंग्रह), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन), रमजान मुल्ला (अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत, कवितासंग्रह), बालवाडःमय पुरस्कार (संजय हळदीकर- मुलंच मुलं), माधव मुकुंद कामत पुरस्कारः (भुईभिंगरी, वसंत खोत), पी. सी. पाटील पुरस्कारः (पाणजंजाळ-सुरेश पाटील), नामदेव भोसले पुरस्कार (परतीचा पाऊस -यशवंत माळी), बाळ पोतदार पुरस्कार (माझ्या जगण्याचे पुस्तक- वि. म. बोते) याशिवाय बॅरिस्टर नाथ पै (अनंत घोटगाळकर), रथ (गोपाळ महामुनी), राजकीय नाटक आणि गो.पु.देशपांडे (रमेश साळुंखे), एकलव्यायन (अर्जुन कुंभार), मराठी कविता परंपरा आणि प्रवाह (सुहासकुमार बोबडे), जांभळमाया (सुभाष कवडे), ऊसकोंडी (श्रीकांत पाटील), दख्खन समृद्ध प्रवास (राकेश साळुंखे), राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र सेवा दल (प्रवीण कोडोलीकर), संविधानाच्या स्वप्नातलं गाव (सुभाष वाघमारे), अक्षरलेणं (ऋजुता माने), नाही गिरवता येत कुठलीच लिपी (स्मिता पाटील), तौलनिक साहित्य अभ्यास (भरत जाधव), स्त्रीहुंकार (कालिंदी कुलकर्णी), बोचऱ्या सुया (राजश्री पाटील), मराठी हास्यात्मिका (आनंद बल्लाळ), ऐसे नको गोरक्षण (दत्ता जाधव), आव्हाने पेलताना (अश्विनी टेंबे), सोनोग्राफी (विजयकुमार माने), कुरकूल (उत्तम सावंत), स्वप्नसत्य (सचिन इनामदार), हिकमत (सुवर्णा पवार), शिरवाळ (हरिश्चंद्र पाटील) आदी पुस्तकांचाही गौरव होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89443 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..