भास्तराचार्य प्रतिष्ठानतर्फे विज्ञान स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भास्तराचार्य प्रतिष्ठानतर्फे विज्ञान स्पर्धेचे आयोजन
भास्तराचार्य प्रतिष्ठानतर्फे विज्ञान स्पर्धेचे आयोजन

भास्तराचार्य प्रतिष्ठानतर्फे विज्ञान स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे
बालवैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर, ता. २२ ः भास्कराचार्य प्रतिष्ठान, विद्यार्थी विकास प्रतिष्ठान, लाईफ इन्सिपरेशन सोशल फाउंडेशन आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बालवैज्ञानिक स्पर्धा, तर सातवी ते दहावी आणि अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा होणार आहे. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांसह प्रमाणपत्रही दिले जाणार आहे, अशी माहिती चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागाचे संचालक डॉ. भारत खराटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
खराटे म्हणाले, ‘‘माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.examchate.com संकेतस्थळाला भेट द्यावी. याच संकेतस्थळावर नाव नोंदणी केली जाणार आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बालवैज्ञानिक स्पर्धेत विज्ञान पाठ्यपुस्तकातील ज्ञानावर आधारित आकलन, उपाययोजना आणि कौशल्यावर आधारित प्रश्न असतील. विज्ञानाशी निगडित सामान्यज्ञानाचे प्रश्नही विचारले जातील. ही परीक्षा ऑनलाइन होणार असून पहिल्या टप्प्यात बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न असतील. एकूण १०० प्रश्न असून त्याला प्रत्येकी १ गुण असणार आहे. दुसरा टप्प्यात मुलाखत प्रत्यक्ष होईल. परीक्षा १८ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता होणार आहे. १० सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे.’’
श्री भास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धेत प्रत्येक वर्गासाठी त्यांच्या मागील इयत्तेच्या गणित, विज्ञान व सामान्यज्ञान या विषयाच्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जातील. अकरावीच्या विद्यार्थ्यांना दहावीतील विज्ञान व गणित या विषयावरील अभ्यासक्रमावर प्रश्न असतील. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील. २४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ही परीक्षा २ ऑक्टोबर ला सकाळी ११ ते १२.३० या वेळेत होईल.’
यावेळी सर्जेराव राऊत, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य मधुकर पाटील उपस्थित होते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89462 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..