रसायनयुक्त पाणी नदीत सोडणाऱ्यांवर कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसायनयुक्त पाणी नदीत सोडणाऱ्यांवर कारवाई करा
रसायनयुक्त पाणी नदीत सोडणाऱ्यांवर कारवाई करा

रसायनयुक्त पाणी नदीत सोडणाऱ्यांवर कारवाई करा

sakal_logo
By

रसायनयुक्त पाणी नदीत
सोडणाऱ्यांवर कारवाई करा

करवीर तालुका शिवसेनेची मागणी

कोल्हापूर, ता. २२ : उचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांची गोदामे आहेत. या साड्या मध्यरात्री रसायनाच्या सहाय्याने नदीच्या पाण्यात धुलाई करून हे प्रदूषित पाणी नदीत सोडले जाते. अशा लोकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या करवीर तालुका शाखेने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात जुन्या साड्यांच्या बदल्यात विविध वस्तू दिल्या जात आहेत. एकत्रित केलेल्या जुन्या साड्यांची गोदामे उचगाव व चिंचवाड परिसरात असून, त्या जुन्या साड्यांवर रासायनिक प्रक्रिया केली जाते. हे रासायनिक पाणी नदी सोडले जात आहे. अशा घातक पाण्यामुळे लोकांचे जगणे मुश्‍कील होणार आहे. एकीकडे, पंचगंगा किंवा नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्य शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे, मात्र हे लोक रसायनयुक्त पाणी नदीत सोडून नदी प्रदूषित करत आहेत. घातक आणि विषारी द्रव्य पाण्यात सोडल्यामुळे जैवविविधता धोक्‍यात येत आहे.
ज्या साड्यांवर प्रक्रिया केलेली असते, त्याच साड्या पुन्हा मोठ्या बाजारात विक्रीसाठी ठेवल्या जात आहे. त्यामुळे एकीकडे प्रदूषण आणि दुसरीकडे ग्राहकांची लूट केली जात आहे. हा प्रकार तत्काळ थांबला पाहिजे, नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असाही इशारा दिला आहे. राजू यादव, राजू सांगावकर, संदीप दळवी, विक्रम चौगुले, शरद माळी, योगेश लव्हटे, प्रफुल्ल घोरपडे, बाळासाहेब नलवडे, बाबूराव पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89489 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..