राधानगरी धरणाचा दरवाजा पुन्हा उघडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधानगरी धरणाचा दरवाजा पुन्हा उघडला
राधानगरी धरणाचा दरवाजा पुन्हा उघडला

राधानगरी धरणाचा दरवाजा पुन्हा उघडला

sakal_logo
By

४४०८१

राधानगरी धरणाचा दरवाजा पुन्हा खुला
पाणलोट क्षेत्रात दमदार; गगनबावड्यात सर्वाधिक १८ मिमी पाऊस
कोल्हापूर, ता. २२ : जिल्ह्यात आज दिवसभर तुरळक पावसाने हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. रात्री साडेआठला राधानगरी धरणाचा स्वयंचलित ६ क्रमांकाचा दरवाजा उघडला. धरणातून एकूण ३०२८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी १८ फूट ५ इंचापर्यंत खाली आली आहे. १० बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात १८.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्‍याव्यतिरिक्त जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे परिस्थिती झपाट्याने कमी झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा-इंचाने कमी होत आहे. पावसाची भुरभुर भात, भुईमूग आणि सोयाबीनसाठी लाभदायक आहे. यामुळे पिकांना उभारी मिळण्यास गती मिळणार आहे.

गेल्या २४ तासात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः हातकणंगले १.३, शिरोळ -०.६, पन्हाळा- ३.३, शाहूवाडी- ६.१, राधानगरी- ३.९, गगनबावडा- १८.१, करवीर- २.७, कागल- २.४, गडहिंग्लज- १.८, भुदरगड ६.९, आजरा- ३.१, चंदगड- ९.९. असा एकूण ३.९.

१० बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, वारणा नदीवरील-चिंचोली, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड असे १० बंधारे पाण्याखाली आहेत.

राधानगरी धरणातून
३०२८ क्युसेक विसर्ग
राधानगरी : आज दुपारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून आवक वाढल्याने या धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी सहा क्रमांकचा दरवाजा आज पुन्हा खुला झाला. यातून १४२८ व वीज निर्मितीसाठी १६०० असा ३०२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. दरम्यान काळम्मावाडी धरण क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने हे धरण २३ टीएमसी पर्यंत भरले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89490 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..