सत्यपालसिंह बघेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्यपालसिंह बघेल
सत्यपालसिंह बघेल

सत्यपालसिंह बघेल

sakal_logo
By

फोटो
४५००५


राजकारणात कोणतीही
शक्यता नाकारता येत नाही
सत्यपालसिंह बघेल; तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. कोणासोबत युती करायची, हे वेळ आल्यावर ठरवले जाईल. त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यामुळे संघटन मजबूत करण्याचे आमचे काम असल्याचे केंद्रीय कायदा मंत्री सत्यपालसिंह बघेल यांनी आज सांगितले. लोकसभा प्रवास योजनेंतर्गत ते आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत का, हे सुद्धा पाहायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षे असली, तरी भाजपकडून आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपकडून देशातील १४४ मतदारसंघामध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, त्यांनी आज करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89496 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..