करुळ घाट शुक्रवारपासून खुला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करुळ घाट शुक्रवारपासून खुला
करुळ घाट शुक्रवारपासून खुला

करुळ घाट शुक्रवारपासून खुला

sakal_logo
By

44985
करुळ ः खचलेल्या घाटरस्त्याचे पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

करुळ घाट शुक्रवारपासून खुला
पुनर्बांधणी अंतिम टप्प्यात; अवजड वाहतूकदारांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
गगनबावडा, ता. २२ ः खचलेल्या करुळ घाट रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. काँक्रीटची भिंत उभारण्याचे काम आज पूर्ण झाले. बाजूपट्टी मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे शुक्रवार (ता. २६) पासून करुळ घाटमार्गे वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
तळेरे-गगनबावडा महामार्गावरील करुळ घाटरस्ता सात ऑगस्टला खचल्याने वाहतूक बंद केली होती. त्यानंतर या मार्गाने जड आणि अवजड वगळून अन्य वाहतूक सुरू केली होती. सध्या वाहतूक फोंडाघाट आणि भुईबावडा घाटमार्गे सुरू आहे. वरिष्ठांनी खचलेल्या घाटरस्त्याची पाहणी केली. त्यानंतर खचलेल्या ठिकाणी काँक्रीटची भिंत उभारण्याची सूचना केली होती. त्यानुसार बांधकामाला सुरुवात झाली. पाऊस आणि त्यामुळे दरडी कोसळण्याची शक्यता या सर्व बाबींचा विचार करून प्रचंड वेगाने काम सुरू होते. खचलेल्या ठिकाणी काँक्रीटची भिंत उभारण्याचे काम आज पूर्ण झाले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत बाजूपट्टी मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
ज्याठिकाणी रस्ता खचला होता, त्याठिकाणाहून नजीकच आणखी एका ठिकाणी रस्ता खचला आहे. त्याचेही काम सुरू आहे. ते दोन-तीन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. ही दोन कामे २५ पर्यंत पूर्ण करून २६ पासून तळेरे-कोल्हापूर मार्गावरून जड आणि अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

गणेशभक्तांसाठी शुभसंकेत
गणेशोत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी दोन-तीन दिवस मोठ्या प्रमाणात गणेशभक्त कोल्हापूरमार्गे गगनबावडा घाटरस्त्याने जिल्ह्यात येतात. हा मार्ग बंद असल्यामुळे त्यांच्या मनात धाकधूक होती. गणेशोत्सवापूर्वीच हा मार्ग सुरू होत असल्यामुळे गणेशभक्तांसाठी तो शुभसंकेत मानला जात आहे.

कोट
‘‘खचलेल्या करुळ घाटरस्त्यांच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आणखी एका ठिकाणी रस्ता खचला आहे. तेथेही काम करण्यात येणार आहे. २५ ऑगस्टपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करून २६ ऑगस्टपासून या मार्गावरून जड अवजड वाहतूक सुरू करण्यात येईल.’’
- अतुल शिवनिवार, उपअभियंता, महामार्ग प्राधिकरण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89501 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..