पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

राजेंद्रनगरात मारामारी
कोल्हापूर ः राजेंद्रनगरात आर्थिक व्यवहारातून रात्री हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये तिघे जखमी झाले. दीपक नागटीळे (वय २६), राम नागटीळे (३०) आणि संभाजी उर्फ काका पोवार (वय ३६) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. यासंबंधी आर्थिक कारणावरुन १५ ऑगस्‍टला वाद झाला होता. आज हा वाद उफाळून आला. सीपीआरमध्ये राजारामपुरी पोलिस दाखल झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत परस्‍परविरोधी गुन्‍हे दाखल करण्‍याचे काम सुरू होते.

नंदगावात मालमत्ता वादातून मारामारी
कोल्हापूर ः मालमत्तेच्या वादातून नंदगाव (ता. करवीर) येथे रात्री मारामारी झाली. यामध्ये सहाजण जखमी झाले. कृष्णांत हंचनाळे (वय ५४), विजय हंचनाळे (३६), राजेंद्र हंचनाळे (३३), विशाल हंचनाळे (३२), निखिल दत्तात्रय पंडित (३४) आणि निलेश दत्तात्रय पंडित (३२, नंदगाव) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याबाबतची नोंद करण्याचे काम सीपीआर चौकीत सुरू होते.

रिक्षाचालकाने केले मशीन परत
कोल्‍हापूर : मध्‍यवर्ती बसस्‍थानक परिसरात मिळालेल्‍या बॅगेतील साडेसहा लाख रुपयांचे मशीन रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केले. प्रशांत कांबळे (मणेरमळा परिसर) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. शाहूपुरीतील एका एजन्‍सीचे मशीन पुण्‍यात पाठविण्‍यात येणार होते. एजन्सीच्या कर्मचाऱ्याने ते बसस्थानकावर आराम बसमधून पाठविण्यासाठी आणले होते. काही कारणास्तव ही बॅग रस्त्याच्या बाजूला तशीच राहिली होती. रिक्षाचालक कांबळे यांच्या ती निदर्शनास आली. त्यांनी ती प्रामाणिकपणे शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणून दिली. पोलिसांनी पत्त्याच्या आधारे संबधित एजन्सीशी संपर्क साधून मशिन त्यांच्या स्वाधिन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89504 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..