गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

अनुराग संगीत विद्यालयाचे यश
गडहिंग्लज : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे झालेल्या गायन, वादन, तबला पखवाज परीक्षेत येथील अनुराग संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. श्रेया चव्हाण हिने गायनमध्ये मध्यमा पूर्ण परीक्षेत विशेष योग्यता मिळवून गडहिंग्लज केंद्रात प्रथम, हर्ष जांभळेने तबला वादनमध्ये मध्यमा पूर्ण या परीक्षेत केंद्रात प्रथम आला. सानिका सावेकर हिने गायन मध्यमा पूर्ण परीक्षेत केंद्रात द्वितीय, हार्मोनियम वादन परीक्षेत श्रावणी जाधव हिने प्रवेशिका प्रथममध्ये विशेष योग्यता मिळविली. श्रीधर बागडी, अथर्व हिरेमठ, उपासना सोनटक्के, जयंतिका बेळगुंदकर, स्वरुप गुरव, दयानंद गुरव, संचित पाटील यांनीही यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना संदीप सोनटक्के व कृष्णा होरंबळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
---------------
प्राथमिक विद्यामंदिरात पालक मेळावा
गडहिंग्लज : गडहिंग्लज प्राथमिक विद्यामंदिरात बालवाडीसह पहिली व दुसरी वर्गाचा पालक मेळावा उत्साहात झाला. प्राचार्य पी. टी. पाटील अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक व्ही. एल. कांबळे, पालक प्रतिनिधी अमित काळे, बाबुराव उपराटे, दिपांजली गायकवाड, वैष्णवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बालवाडी विभागाच्या शोभना सुतार, पहिलीच्या वर्गशिक्षिका राधा लब्यागोळ व दुसरीच्या वर्गशिक्षिका सुषमा कांबळे यांनी विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक कांबळे यांनी स्वागत केले. लब्यागोळ यांनी आभार मानले.
----------------
जांभूळवाडीत गौरव समारंभ
गडहिंग्लज : जांभूळवाडी (ता. गडहिंग्लज) येथे श्री हनुमान सार्वजनिक वाचनालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा गौरव करण्यात आला. निवृत्त जवान तुकाराम देसाई यांचा रामचंद्र सरोळकर यांच्या हस्ते सत्कार झाला. दहावी परीक्षेतील गुणवंत प्रांजल मुसळे, बारावी परीक्षेतील प्राची मुसळे यांचा गौरव झाला. निवृत्त कृषी सहायक रघुनाथ देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्या देसाई अध्यक्षस्थानी होत्या. तुकाराम देसाई यांनी लिहलेले पुस्तक वाचनालयाला भेट दिले. संस्थापक डी. व्ही. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथपाल सुरेश मुसळे यांनी आभार मानले. राजाराम देसाई, अंतू देसाई, केशव कांबळे, सुधाकर नौकूडकर, सुरेश कांबळे, शिवाजी पाटील, उपाध्यक्षा लिलाबाई सरोळकर, संचालिका वैशाली सरोळकर, वैशाली कांबळे, सचिव आशा चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89532 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..