राजीव गांधी पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजीव गांधी पतसंस्थेतर्फे 
सभासदांना १५ टक्के लाभांश
राजीव गांधी पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश

राजीव गांधी पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश

sakal_logo
By

45203
कुदनूर : संस्था सभेत मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील. व्यासपीठावर अन्य संचालक.

राजीव गांधी पतसंस्थेतर्फे
सभासदांना १५ टक्के लाभांश
कुदनूर, ता. २४ : कुदनूर येथील राजीव गांधी बिगरशेती पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. या वेळी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची नीट उत्तरे मिळाल्यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील यांनी सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. सभेच्या अध्यक्षस्थानी पी. बी. पाटील होते.
संस्थेचे मुख्य व्यवस्थापक नामदेव कोकीतकर यांनी स्वागत केले. प्रतिमा पूजन-दीपप्रज्वलन पी. बी. पाटील, अशोक गवंडी, विष्णू बागिलगेकर, निंगाप्पा माने, झिमाना पाटील, सुखदेव शहापूरकर, पुंडलिक कोकीतकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील यांनी शासनाच्या जाचक अटींबद्द‌ल चिंता व्यक्त केली. नामदेव कोकीतकर यांनी अहवाल वाचन केले. ज्येष्ठ संचालक प्रा. सुखदेव शहापूरकर यांनी कामगारांना कार्यकुशलतेनुसार वेतन देणार असल्याचे सांगितले. संतराम पाटील, झुबेर काझी, गावडे, प्रकाश हेब्बाळकर, रझाक सनदी यांनी विविध विषयांवर प्रश्‍न विचारले. दत्तात्रय पताडे, तुळजू कोकीतकर यांनी संस्थेच्या दौलत कारखान्यातील गुंतवणुकीबाबत विचारणा करून ती लवकरात लवकर वसूल करण्याची सूचना केली. या वेळी उपाध्यक्ष अशोक गवंडी, पुंडलिक कोकीतकर, प्रा. सुखदेव शहापूरकर, सुबराव आंबेवाडकर, परशराम पाटील, जोतिबा पवार, सिद्धाप्पा हडलगेकर, उदय लोहार, इमाम शमनुचे, कल्लाप्पा कांबळे, अनुसया पाटील, लक्ष्मी बंबर्गेकर, निंगाप्पा माने, विष्णू बागिलगेकर, शिवाजी नौकुडकर, झिंमाणा पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. रवींद्र देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89563 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..